Jawan Deepak Bansode Martyred Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: बुलडाण्याच्या सुपुत्राला वीरमरण, दहशतवाद्यांसोबत लढताना शहीद

Jawan Deepak Bansode Martyred: दहशतवाद्यांशी दोन हात करताना बुलडाण्याचा सुपुत्र दीपक बनसोडे यांना वीरमरण आले. त्यांचे शहीद झाल्याचे वृत्त कळता कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत बुलडाण्याचा सुपुत्र शहीद झाला. पळसखेड नागो या गावातील रहिवासी असलेल्या दीपक बनसोडे यांना जम्मू-काश्मिरमध्ये वीरमरण आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी उद्या शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दीपक बनसोडे यांच्या शहीद झाल्याची बातमी कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पळसखेड नागो या गावावर सध्या शोककळा पसरली आहे.

दीपक बनसोडे यांचे पळसखेड नागो या मूळ गावीच लहानेचे मोठे झाले. याच गावामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. दीपक बनसोडे हे पाच वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले होते. ते जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होते. जम्मू-काश्मीर येथील हेडकॉटर 7 सेक्टर आर आर या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना ते शहीद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच आहे. दहशतवाद्यांकडून घुसखोरी, जवानांवर गोळीबार यासारख्या घटनावारंवार समोर येत आहेत. भारतीय जवान देखील दहशतवाद्यांच्या या कारवायांना चौख प्रत्युत्तर देत आहेत. तीन दिवसांपूर्वी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना जवानांनी घेराव घातला होता. १२ आणि १३ जून रोजी झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT