Buldhana Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : जळगाव जामोदच्या मुख्याधिकारीसह विद्युत पर्यवेक्षक एसीबीच्या ताब्यात; १२ हजार रुपयाची लाच घेतांना अटक

Buldhana News : दुरुस्तीच्या कामाचे बिल टाकले होते. हे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून संबंधित ठेकेदाराकडून मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक या दोघांनीही लाच मागितली

Rajesh Sonwane

संजय जाधव 

बुलढाणा : जळगाव जामोद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नगरपरिषदेचे विद्यूत पर्यवेक्षक (Buldhana) अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यामध्ये अडकले. बिल अदा केल्याने ठेकेदाराकडून १२ हजार रुपयांची लाच घेताना या दोघांना (ACB) एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. (Maharashtra News)

जळगाव जामोद शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे बिल टाकले होते. हे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून संबंधित ठेकेदाराकडून मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक या दोघांनीही लाच मागितली होती. १२ हजार रुपयांच्या (Bribe) लाचेची मागणी केली होती. मात्र लाच देण्याची मानसिकता नसल्यामुळे या संबंधीची तक्रार ठेकेदाराने अँटी करप्शन ब्युरोकडे केली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एसीबीच्या पथकाने आज सकाळी ११ वाजेच्या सुमारात सापळा रचून जळगाव जामोदचे मुख्याधिकारी आकाश डोईफोडे आणि नगरपरिषदेचे विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके या दोघांना तक्रारदाराकडून बारा हजार रुपयांची लाच घेताना नगरपरिषदेतच्या आवारातच रंगेहात पकडले. विशेष म्हणजे आरोपी मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक हे दोन्ही तरुण असून आकाश डोईफोडे हा अहमदनगर जिल्ह्यातील तर दीपक शेळके हा मोताळा तालुक्यातील उबाळखेडचा मूळ रहिवासी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT