Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर तरुण टोळक्याचा हल्ला; दुचाकीची केली तोडफोड

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर तरुण टोळक्याचा हल्ला; दुचाकीची केली तोडफोड

संजय जाधव

बुलढाणा : दुचाकी अंगावर टाकल्याच्या शुल्लक कारणावरून बुलढाणा येथील कैकाडी पुरा भागात दोन जणांना मारहाण करून एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावर १० ते १५ जणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्या व दगडाने हल्ला केला. इतकेच नाही तर घरासमोर उभी असलेली दुचाकीची तोडफोड करून दहशत माजविल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी (Police) फक्त चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (buldhana gang attack on police officer house Kelly vandalism of the bike)

बुलढाणा (Buldhana) शहरातील सोळंके लेआउट येथील रहिवासी पोलीस कर्मचारी शेख सरवर शेख अनवर यांचे घराचे बांधकाम व इतर काम करण्याकरिता घरासमोर उभे होते. त्याठिकाणी आरोपी विक्रम जाधव व अनिल पवार (दोघे रा.भीलवाडा, बुलढाणा) यांनी आपली मोटर सायकल अंगावर आणली; म्हणून त्यांना म्हटले की तुम्ही मोटरसायकल अंगावर का आणली? या कारणावरून दोघांनी शिवीगाळ करत काठीने मारहाण करून जखमी केले.

ते रात्री पुन्‍‍हा आले

दरम्यान पुन्हा रात्रीच्या वेळेस थोड्या वेळानंतर १० ते १५ तरुणांच्या टोळक्याने चाल करून पोलीस कर्मचारी शेख सरवर यांच्या घरावर हल्ला केला. तसेच घरासमोर उभी असलेली दुचाकीची काठ्या व दगडाने तोडफोड करून दुचाकीचे नुकसान केले. अशा तक्रारीवर बुलढाणा शहर पोलिस (Buldhana Police) ठाण्यात आरोपी विक्रम जाधव व अनिल पवार व इतर दोन असे एकूण चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी विक्रम जाधव याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

September Rule Changes: दुधापासून ते LPG सिलिंडरपर्यंत... १ सप्टेंबरपासून बदणार हे ९ नियम; सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार परिणाम

Crime : प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या समर्थकाला संपवलं, घराजवळच भयंकर हल्ला; शहरात प्रचंड खळबळ

Maharashtra News Live Update: पुण्यातील RSS कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; मनुस्मृती दहनाचा इशारा

Krishna Janmashtami 2026 : 4 की 5 सप्टेंबर? यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Dhaniya Panjiri Recipe : जन्माष्टमीला श्रीकृष्णासाठी खास नैवेद्य! 'अशी' बनवा फक्त १० मिनिटांत चविष्ट पंजिरी

SCROLL FOR NEXT