Ashadhi Wari
Ashadhi Wari  Saam TV
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2023: विठुरायाच्या भेटीची ओढ; संत गजानन महाराजांच्या पालखीचं शेगावातून पंढरपूरकडे प्रस्थान

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

Buldhana News: पंढरपूर येथील येत्या आषाढी उत्सवासाठी सर्व भाविक तयारीला लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर शेगाव येथून संत गजानन महाराज यांची पालखीचे आज शेगावातून पंढरपूरसाठी प्रस्थान होत आहे. यंदा संत गजानन महाराज पालखीची ही ५४ वी वारी आहे. (Latets Marathi News)

मध्यंतरी कोरोनामुळे दोन वर्ष पंढरपूर वारीत खंड पडला होता. मात्र यंदाची वारी मोठ्या उत्साहात पंढरपुरातून निघत आहे. पुढील ३० दिवसात ७०० वारकऱ्यांसह ५५० किलोमीटरचे अंतर पायी चालत ही पालखी २७ जून रोजी पंढरपुरात पोहचणार आहे.

अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पांढरा वेश धारण केलेले वारकरी 'गण गण गणात बोते' चा गजर करत मार्गस्थ होत आहेत. पालखीला शेगावातून निरोप देण्यासाठी हजारो भाविकांनी आज शेगावात हजेरी लावली आहे.

आषाढी यात्रेनिमित्‍ताने मंदिर समितीचा महत्‍त्‍वाचा निर्णय

महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्‍या यंदाचा आषाढी पालखी सोहळा येत्या २९ जूनला साजरा होणार आहे. आषाढी यात्रेदरम्यान भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आता मोबाईल घेवून‌ जाता येणार आहे. तथापी मोबाईल वापरास मात्र बंदी कायम ठेवली आहे.

आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आषाढी यात्रा काळात भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांना मोबाईल घेवून‌ जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT