Buldhana Police Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Police : धमकावत पैसे घेणे भोवले; खंडणीखोर पाच पोलीस कर्मचारी निलंबित, बुलढाणा पोलीस दलात खळबळ

Buldhana News : कर्नाटकातील वाहन असल्याच्या कारणातून पोलिसांनी दोन ठिकाणी वाहनांची अडवणूक करत संबंधितांना धमकावले तसेच पैसे देखील उकलण्यात आल्याचा प्रकार चिखली येथे घडला होता, या प्रकरणाने खळबळ उडाली होती

संजय जाधव

बुलढाणा : कर्नाटकातून आलेल्या वाहन चालकांला अडवत त्यांना धमकावत जबरदस्तीने पैसे उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्याच्या चिखली येथे समोर आला होता. या प्रकरणाची बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी दखल घेत खंडणीखोर पाच पोलिसांविरुद्ध कारवाई केली आहे. या पाचही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

कर्नाटक राज्यातून मलकापूर येथे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जागा पाहण्यासाठी जात असलेल्या कारला पोलिसांनी अडविले होते. कारवाई टाळण्यासाठी त्यांना धमकावत तसेच त्यांच्याकडून खंडणी उकड्ण्यात आली होती. बुलढाणा- चिखली रस्त्यावर हा प्रकार घडला होता. यात दोन ठिकाणी या कार अडवून सुरवातीला १५०० रुपये ऑनलाईन तर काही अंतरावर ५० हजार रुपये घेण्यात आल्याचे समोर आले होते.

पोलीस अधीक्षकांकडून कारवाई

परराज्यातून आलेल्या कार चालकाला ब्लॅकमेल करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या पाच वाहतूक पोलिसांच गुन्हेगारी स्वरूपाच वर्तन उघड झाले होते. या नंतर बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 

या कर्मचाऱ्यांचे झाले निलंबन 

चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले अभय टेकाळे, गजानन भंडारी, विठ्ठल काळुसे, विजय आंधळे व संदीप किरके असे या पाच वाहतूक पोलिसांचे नाव असून त्यांच्यावर अशोभनीय वर्तन, बेशिस्त व बेजबाबदारपणा करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यातून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे बुलढाणा पोलीस दलाची मात्र मोठी नाचक्की झाल्याचं बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT