Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : हनुमान सागर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग; वान नदीला पूर, दहा गावांचा संपर्क तुटला, केळीचे पीक पाण्याखाली

Buldhana News : पश्चिम विदर्भ व मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हनुमान सागर प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा, अमरावती व अकोला शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या हनुमान सागर प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी वान नदीला मोठा पूर आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. पुराचे पाणी अनेक भागांमध्ये शिरल्याने जवळपास आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे.   

पश्चिम विदर्भ व मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यात (Heavy Rain) मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हनुमान सागर प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पातून १ सप्टेंबरच्या रात्री प्रकल्पातूल ३ हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील वान नदीला आलेल्या पुरामुळे जवळपास आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे. तर (Buldhana) जिल्ह्यातील मोमिनाबाद, वडगाव, वान, कोलद या गावांचा संपर्क गेल्या अनेक दिवसापासून तुटला आहे.

चुकीच्या ठिकाणी बांध बांधल्याने नुकसान 

नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर वरील केळीचे पीकही पाण्याखाली गेले आहे. वान नदीवर मोमिनाबाद गावाजवळ प्रशासनाने चुकीच्या ठिकाणी बांध बांधल्याने ही परिस्थिती उद्भवली; असा गावातील नागरिकांचा आरोप आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोमिनाबाद हे गाव जिल्हा मुख्यालयाच्या संपर्क तुटलेला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने लक्ष दिलं नसल्याचा आरोप ही गावकऱ्यांनी केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: मेकअप ब्रशचे किती प्रकार असतात? जाणून घ्या, ते कसे वापरायचे

Ajinkya Rahane: KKR ने 'या' तीन खेळाडूंची लाज वाचवली? अखेरच्या क्षणाला अजिंक्य रहाणेसोबत 'या' खेळाडूंना घेतलं ताफ्यात

Weight Loss Tips: हिवाळ्यात खा हे पदार्थ, पोटाची ढेरी होईल कमी, दिसाल सडपातळ

French Fries Recipe: घरच्याघरी बनवा हॉटेलसारखे कुरकुरीत अन् टेस्टी फ्रेंच फ्राइज

Viral Post: ट्रांस्परंट पाकिटात डिलिव्हर झाली 'ती' खाजगी वस्तू, ऑफइसमध्ये सर्वांसमोर व्हावे लागले लज्जीत

SCROLL FOR NEXT