बुलढाणा : जालना येथे झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. याच्या निषेधार्थ आज बुधवारी शेगावात नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देत दानवेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. (buldhana news Demand for resignation of raosaheb Danve)
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची अवस्था तिरुपती येथील न्हाव्यांसारखी झाली आहे. तिरूपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात. तसेच, काम महाविकास आघाडीचे झाल्याची टीका केली होती. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ शेगाव (Shegaon) येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देत यामध्ये दानवेंकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली.
अधी कटींगचे बॅनर लावून निषेध
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात नाभिक समाज आक्रमक झाला आहे. महाविकास आघाडीवर टीका करताना रावसाहेब दानवे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगावात समाजाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी रावसाहेब दानवेंची अर्धी कटींग असलेले फलक लावून निषेध नोंदविला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.