Buldhana Accident Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident : बसला धडक देऊन दुभाजकावर धडकली कार; चारजण जखमी

बसला धडक देऊन दुभाजकावर धडकली कार; चारजण जखमी

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव बसस्थानकावरून नाशिककडे जाणाऱ्या एसटी बसला एका कारने धडक (Accident) दिली. यानंतर कार रस्‍त्‍यावरील दुभाजकाला जावून (Buldhana) धडकली. यात चारजण गंभीर जखमी झाले आहेत. (Tajya Batmya)

बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील नाशिककडे बस मार्गस्‍थ झाली होती. या दरम्‍यान समोरून भरधाव वेगाने कार येत होती. या कारने एसटी बसला धडक दिल्यानंतर अनियंत्रित झालेली कार पुन्हा रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील 4 जण जखमी झाले आहेत. त्यांना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णाल्यात भरती करण्यात आले आहे.

जीवितहानी टळली

कारने बसला दिलेल्‍या धडकेमुळे झालेल्‍या अपघातात एसटीसह कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. खामगाव नांदुरा रोडवरील एका वाईन बारजवळ हा अपघात झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhai Dooj 2025: आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

Bhaubeej Marathi Wishes: भाऊ-बहिणीच्या नात्याचा खास सण! लाडक्या भाऊरायाला पाठवा 'या' खास शुभेच्छा

Budh Gochar: उद्या बुध ग्रह करणार राशीत बदल; दिवाळीमध्ये 'या' 3 राशींची होणार चांदीच चांदी

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

SCROLL FOR NEXT