Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

वाढदिवस साजरा झाला अन्‌ बालकाचा मृत्‍यू; खेळताना घडली घटना

वाढदिवस साजरा झाला अन्‌ बालकाचा मृत्‍यू; खेळताना घडली घटना

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथील घरकुलाच्या बांधकामा दरम्यान शौचालयासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू (Death) झाला. शौर्य गणेश इंगळे अस मृत्यू झालेल्या बालकाच नाव आहे. (Letest Marathi News)

घराच्या अंगणात (Buldhana) खेळत असताना शौर्य खड्ड्याजवळ गेला आणि खड्ड्यात पडला. आई घर कामात व्यस्त होती. तर वडील कामावर गेले असताना ही हृदयद्रावक घटना घडली. घरात काम करत असलेल्‍या आईला बराच वेळ झाल्यावर शौर्य दिसत नसल्याचे लक्षात आले. यानंतर आईने शोधाशोध केली. परंतु, शौर्य मिळून आला नाही. यानंतर खड्ड्यात पाहिले असता ही घटना उघडकीस आली. शौर्यला खड्ड्यातून बाहेर काढून मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

वाढदिवसाच्‍या दुसऱ्याच दिवशी मृत्‍यू

शौर्य याचा दुर्देवी मृत्‍यू झाला. तत्‍पुर्वी आदल्‍याच दिवशी शौर्यचा वाढदिवस उत्‍साहात साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाच्‍या दुसऱ्याच दिवशी शौर्यला मृत्‍यूने गाठले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana Haldi : हळदीत रंगले स्मृती-पलाश; टीम इंडिया बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Maharashtra Government: आमदार-खासदारांसोबत कसं वागावं? अधिकाऱ्यांसाठी 9 कलमी राजेशाही फर्मान

अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Success Story: १० बाय १०च्या खोलीत फुलवली केशरची शेती, संभाजीनगरच्या लेकीचा यशस्वी प्रयोग

SCROLL FOR NEXT