Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : संतप्त शेतकऱ्यांची सोनेवाडीत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

Buldhana News : शेतीमधुन लागवडीचा खर्च निघणे कठीण झाले आहे. भाववाढीची वाट पहात २०२४ साल आले. परंतु शेतमालाचे भाव आणखीच कमी होत चालले आहे.

संजय जाधव

बुलढाणा : सोयाबीन, कापूस, तुरीचा भाव अर्ध्यावर आणला. दुष्काळी, नापिकी, अतिवृष्टी, पिकविमा (Buldhana) कोणतेही शंभर टक्के शेतकऱ्यांना सहकार्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या सोनेवाडी येथील शेतकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. तसा फलकच गावाच्या प्रवेशद्वारावरच लावला आहे. (Tajya Batmya)

शेतीमधुन लागवडीचा खर्च निघणे कठीण झाले आहे. भाववाढीची वाट पहात २०२४ साल आले. परंतु शेतमालाचे भाव आणखीच (Cotton Price) कमी होत चालले आहे. शेतकऱ्यांची भावना समजुन घेण्यासाठी कोणताही राजकीय नेता बोलायला तयार नाही. सताधाऱ्यांप्रमाणे विरोधकांनी सुद्धा या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणुन शेतकऱ्यांची भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहे. राजकीय पुढाऱ्यांवर आक्रोश निर्माण होत (Farmer) शेतकऱ्यांला कोणीही वाली नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये वाढीस लागली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील शेतकरी, युवावर्ग यांनी पुढाऱ्यांना गावबंदीचा फलक लावला आहे. जर हे सरकार शेतकऱ्याला त्याच्या घामाचा दाम देऊ शकत नसेल, तर ह्या सरकारला राज्य करण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे सरकार, पुढारी यांच्या विरोधात गावबंदी जाहिर केली आहे. सोनेवाडी येथील युवा शेतकरी समाधान जाधव यांनी सांगितले व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT