Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : गुरांसह शेतकरी कुटुंबीयांचे तहसिलमध्ये ठिय्या आंदोलन; अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा

Buldhana News : पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर शासनाने नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र सात महिने उलटून देखील मदत मिळाली नाही

संजय जाधव

बुलढाणा : मागील सात महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची भरपाई अजूनही मिळाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या (Farmer) शेतकऱ्यांनी आज जळगाव जामोद तहसिल कार्यालयासमोर कुटुंब व गुराढोरासह आंदोलन सुरू केले. यामुळे तहसिल प्रशासन हादरले असून (Jalgaon) जळगाव मध्ये खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पावसाळ्यात अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर शासनाने नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र सात महिने उलटून देखील मदत मिळाली नाही. याबाबत (Buldhana) वारंवार अर्ज निवेदने करूनही प्रशासन काहीच कार्यवाही करीत नसून भरपाई वाटपात मनमानी करण्यात येत आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज परिवार व बैलगाड्यासह जळगाव तहसिल गाठले. बैलगाड्या कार्यालय परिसरात सोडून मंडपात ठिय्या मांडला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाटण शिवारातील ज्ञानेश्वर ओंकार खिरोडकर, विठ्ठल घुले, विनोद समाधान जाधव यांनी उपोषण सुरू केले आहे. काही शेतकऱ्यांना मिळालेली मदत अत्यंत तोकडी असून अनेकजण मदतीपासून अजूनही वंचित आहे. शासन निर्णयातील निकष डावलून मनमानी पद्धतीने भरपाई देण्यात आली आहे. यामुळे तात्काळ व निकषांनुसार मदत मिळावी, शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध तहसीलदार यांनी कारवाई करावी. दोन शिवारात शेती असलेल्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले असून त्यांना मदत देण्यात यावी आदी मागण्यासाठी हे अभिनव आंदोलन करण्यात आले. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील, जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर यांनी शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी उपोषण मंडपात ठिय्या दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT