Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: आगार व्यवस्थापकासह वाहक एसीबीच्या जाळ्यात; अहवाल न पाठवण्यासाठी घेतली ३५ हजाराची लाच

Buldhana News :

Rajesh Sonwane

संजय जाधव 
बुलढाणा
: पंढरपूर यात्रेदरम्यान झालेल्या प्रकारचा अहवाल विभाग नियंत्रक यांच्याकडे न पाठवण्यासाठी (Buldhana) लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम स्वीकारतांना आगार व्यवस्थापक व वाहकास लाच लुचपत विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. (Tajya Batmya)

राज्य परिवहन महामंडळाच्या बस पंढरपूर यात्रेसाठी जाडा सोडण्यात आल्या होत्या. या दरम्यान बुलढाणा आगारातील काही बस चालक व वाहन यांनी बसमध्ये स्टोहवर स्वयंपाक केला होता. ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कर्मचाऱ्यावर (Bribe) कारवाई करण्यासाठी विभाग नियंत्रक यांच्याकडे अहवाल न पाठवण्यासाठी बुलढाणा आगार व्यवस्थापक संतोष वानेरे आणि महादेव सावरकर यांनी ३५ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी फिर्यादीने यापूर्वी आरोपींना २८ हजार रुपये दिले आहेत. 

८ हजार स्वीकारतांना अटक 

उर्वरित रकमेसाठी त्यांना वारंवार मागणी होत असल्याची तक्रार फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून उर्वरित आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना (MSRTC) संतोष वानेरे आणि महादेव सावरकर या एस टी महामंडळाच्या दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. कुठल्याही कार्यालयातील शासकीय काम करून देण्यासाठी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी; असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक शितल घोगरे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Maharashtra Live News Update: अजित पवार यांची महात्मा फुले वाड्याला भेट

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

SCROLL FOR NEXT