Buldana News  Saam Tv
महाराष्ट्र

Buldana News : देशसेवेचं स्वप्न अपूर्णच राहिलं! बुलडाणामध्ये १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Buldana Latest News : देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सैन्यभरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Boy Died Due To Heartattack In Buldana

देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सैन्यभरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुलडाणा येथील संग्रामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरातील लोकांना धक्का बसला आहे.

सैन्यात भरती होण्यासाठी गणेश विष्णू लोणकर हा तरुण प्रयत्न करत होता. त्यासाठी तो रोज धावण्याचा व व्यायामाच सराव करायचा. सराव करुन घरी आल्यावर गणेशचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हृदयविकाच्या झटक्याने हा मृत्यू झाला आहे. या घटनेने गणेश कुटुंबियांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.

सैन्यात भरती होण्यासाठी गणेश रोज सराव करायचा. सकाळी व्यायाम करुन गणेश घरी आल्यानंतर त्याने चहापाणी केले. चहापाणी केल्यानंतर गणेश अचानक जमीनीवर कोसळला. त्यानंतर घरच्यांनी त्याला तातडीने संग्रामपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेते असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

संग्रामपूरमधील टुनकी गावातील या घटनेने संपूर्ण गावकऱ्यांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना घडल्यानंतर गणेशच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. ऐन तरुण वयात मुलगा गेल्याने गणेशच्या आई वडिलांवर शोककळा पसरली आहे.

देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गणेश मेहनत करत होता. परंतु काळाने घाला घालावा तसा गणेशचा मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT