Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: आगीचे भिषण तांडव; गोठ्याला आग लागल्याने ८ जनावरांचा मृत्‍यू

आगीचे भिषण तांडव; गोठ्याला आग लागल्याने ८ जनावरांचा मृत्‍यू

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात आगीच्या घटनांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. अशीच एक मनाला हेलावून टाकणारी घटना (Buldhana) बुलढाणा तालुक्यातील इरला येथे रात्रीच्या सुमारास घडलीय. शेतातील गोठ्याला आग (Fire) लागल्याने या आगीमध्ये ८ जनावरांचा जळून मृत्‍यू झाला. (Tajya Batmya)

इरला (जि. बुलढाणा) येथील शेतकरी भागवत सरोदे यांच्‍या शेतात जनावरे बांधण्यासाठी गोठा केला आहे. येथे जनावरे बांधून ठेवलेले असतात. शेतकरी सरोदे हे नेहमीप्रमाणे चारापाणी करुन गोठ्यामध्ये गुरे बांधलेली होती. तसेच या गोठ्यामध्ये त्यांनी शेतीपयोगी साहित्य देखील ठेवलेले होते. दरम्‍यान रात्रीच्या सुमारास सरोदे यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली. यामध्‍ये आठ जनावर आणि शेती साहित्य जळले.

दहा लाखाचे नुकसान

शेतकरी सरोदे यांच्‍या गोठ्यात असलेली ८ जनावरांचा आगीत जळून मृत्‍यू झाला. तसेच गोठ्यात ठेवलेले शेतीपयोगी साहित्य सुद्धा जळून खाक झाल्याने त्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असून शेतकरी भागवत सरोदे यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोने-चांदीचे दर वाढले

Home Decoration Ideas : या ६ प्रकारे सजवा तुमच्या स्वप्नातील नवीन घर, अधिक सुंदर दिसेल

Shocking: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबई हादरली; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Kidney Damage: व्हिटॅमिन B12 च्या गोळ्या किडनीचं करतात नुकसान; तज्ज्ञांनी सांगितलेली कारणे एकदा वाचाच

भीषण अपघाताचा थरार! भरधाव बस अचानक उलटली, १६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT