Buldhana Crime News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime News : आईच्या उपचारासाठी बँकेतून काढलेले ५० हजार लांबविले; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

Buldhana News : आईच्या उपचारासाठी बँकेतून काढलेले ५० हजार लांबविले; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

संजय जाधव

बुलढाणा : जळगाव जामोद शहरातील गजबजलेला परिसरातील जुनी भाजी मार्केट येथे भर दिवसा (Buldhana) चोरी झाल्याचा प्रकार घडला. एका व्यक्तीच्या किराणा सामानाच्या पिशवीतून ५० हजार रुपयाची चोरी (Theft) झाल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलीस त्या चार चोरट्याचा शोध घेत आहे. (Maharashtra News)

वडगाव पाटण येथी राहणार फिर्यादी दिगंबर ज्ञानदेव वाघ यांनी जळगाव जामोद पोलिसात याविषयी तक्रार दाखल केली आहे. दिगंबर वाघ यांनी त्यांच्या आईच्या उपचारासाठी स्टेट बँक कृषी शाखा जळगाव जामोद येथुन ५० हजार रुपये काढले. ही रक्कम कापडी पिशवीमध्ये ठेवुन त्यांनी खरेदी केलेल्या किराणा सामानाच्या थैलीमध्ये ठवले होते व ती पिशवी त्यांचे मोटर सायकलला बांधुन एका जनरल स्टोअर्ससमोर उभी केली. त्या स्टोअर्स मध्ये गेले असता पाळत ठेवलेल्या चार जणांनी त्या पिशवीतील ५० हजार रुप्याची पिशवी काढून पळ काढला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिगंबर वाघ हे जनरल स्टोअर्समधुन थोड्याच वेळात मोटरसायकलजवळ आले असता त्यांचे मोटरसायकलवरील किराणा समानाची पिशवी अस्ताव्यस्थ दिसली. त्यांनी पिशवी उघडुन पाहली असता त्यामध्ये ठेवलेली (Police) पैशांची कापडी पिशवी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी शेजारील मोहन ट्रेडर्स जळगाव जा. यांचे दुकानमध्ये लावलेल्या (CCTV) सीसीटीव्ही फुटेज पाहीले असता चार अनोळखी आरोपी गाडीच्या भोवती फिरत पाहणी करुन एकाने गाडीला बांधलेल्या किराणा थैलीतील नगदी रक्कम ठेवलेली कापडी पिशवी काढून पसार झाल्याचे दिसले. फिर्यादीच्या तक्रारीवरून (Jalgaon) जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ समाधान तायडे करीत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT