Buldhana Crime Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime : सिनेस्टाईल पाठलाग सुरु असताना चोरट्यांच्या गाडीचा अपघात; पाच चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Buldhana News : किराणा दुकानावर लक्ष्य ठेवले होते. रात्रीच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोख रक्कम आणि किरकोळ साहित्य चोरले. यानंतर चोरटे शहरातील आणखी काही दुकाने फोडण्याच्या तयारीत होते.

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरातील मापारी गल्ली परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत मुद्देमालासह अटक केली आहे. या घटनेतील पाच चोरट्यांनी एका कारमधून शहरात प्रवेश करत शरद लुनीया यांचे किराणा दुकान फोडले. परंतु चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असताना ते पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच आरोपींनी बुलढाण्याच्या लोणार शहरातील मापारी गल्लीत असलेल्या शरद लुनिया यांच्या किराणा दुकानावर लक्ष्य ठेवले होते. रात्रीच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील काही रोख रक्कम आणि किरकोळ साहित्य चोरले. यानंतर चोरटे शहरातील आणखी काही दुकाने फोडण्याच्या तयारीत होते. मात्र शहरात गस्त घालणाऱ्या लोणार पोलिसांना त्यांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. 

पोलीस असल्याचे दिसताच काढला पळ 

यानंतर लोणार पोलिसांच्या पथकाने चोरट्यांवर लक्ष ठेवले. मात्र पोलीस असल्याचे लक्षात येताच चोरटयांनी कार घेऊन घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ चोरट्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. सिनेस्टाईलने काही अंतर पाठलाग करत असताना मेहकर रोडवर चोरट्यांच्या गाडीचा अचानक टायर फुटला. त्यामुळे गाडीचा ताबा सुटून गाडीचा अपघात झाला.

मुद्देमालासह चोरटे ताब्यात 

अपघात होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांना ताब्यात घेतले. यामध्ये कृष्णा सुदाम छोडीदार, साहेबराव उर्फ बाप्पा पराजी (चालक), परमेश्वर अशोक गायकवाड या आरोपींना अटक केली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून त्यांच्याकडून चोरी केलेली रोकड आणि साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. तसेच चोरीसाठी वापरलेली कार देखील पोलिसांनी जप्त केली असून अधिक तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT