Scorching heat grips Buldhana as temperatures soar to 43°C, marking a record after nearly seven decades. 
महाराष्ट्र

Buldhana Temperature: हिल स्टेशन झालं उष्ण हवेचं ठिकाण! तब्बल ६८ वर्षानंतर बुलढाण्यात ४३ डिग्री तापमानाची नोंद

Buldhana Temperature Hits 43°C : महाराष्ट्रातील उष्णतेच्या लाट पसरली आहे. एके काळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाण्यात ४३°C तापमानाची नोंद झाली.

Bharat Jadhav

  • हवामान बदल आणि उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात मोठी वाढ होत आहे.

  • बुलढाण्यात तब्बल ४३ अंश सेल्सिअस तापमान

  • थंड हवेचं ठिकाण आता उष्णतेचं ठिकाण झाले आहे.

संजय जाधव, साम प्रतिनिधी

बुलढाणा शहर हे थंड हवेच ठिकाण म्हणून ओळखलं जात होतं, मात्र आता हे उष्ण हवेच ठिकाण बनलंय. तब्बल ६८ वर्षानंतर बुलढाण्याचे तापमान पुन्हा ४३ अंश सेल्सिअस इतकी आज नोंद झाली आहे. दिवसेंदिवस बुलढाणा हे उष्ण हवेचे ठिकाण बनू लागलंय. महाराष्ट्र गॅझेटिअरनुसार यापूर्वी २३ मे १९५४ व २५ एप्रिल १९५८ रोजी ४२.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र आज ४३ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

इंग्रजांच्या काळात बुलढाणा हे हिल्स स्टेशन अर्थात थंड हवेच ठिकाण म्हणून ओळखल जात होतं, त्यामुळेच इंग्रजांनी हे जिल्हा मुख्यालय केलं होतं. बुलढाण्याचं सरासरी तापमान उन्हाळ्यात ३५ ते ४०अंश पावसाळ्यात २६ ते २७ अंश तर हिवाळ्यात १० ते २४ अंशापर्यंत असतं, मात्र एकेकाळी थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या बुलढाण्याने आता आपली ओळख गमावली तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खामगावात भंगाराच्या दुकानाला आग लागली

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी उन्हाचा पारा सतत वाढलेला आहे. खामगावमध्ये तापमानात वाढले असून पर्यावसान शहरात आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. आता काही वेळापूर्वी खामगाव येथील खामगाव - शेगांव रोडवरील SSDV शाळेच्या मागे भंगार दुकानाला भीषण आग लागली आहे. आग एवढी भीषण होती की ती विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जातोय.

भर उन्हात विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून प्रचंड उष्णतेची लाट सुरू असताना मलकापूर येथील चौथीच्या विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा तब्बल 44 अंश तापमानात घेण्यात आली. भर दुपारी लहान विद्यार्थ्यांना टीन पत्र्याच्या उष्ण खोलीत बसवण्यात आल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अत्यंत उष्ण हवामानात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व सोयीस्कर व्यवस्था असणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून योग्य नियोजन न झाल्याचे दिसून आले. इतर जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Success Story : पतीची साथ सुटली, वडिलांची सावली हरपली; मुलीसाठी लढली अन् पालघर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड

Chivda Vs Murmura: चिवडा की मुरमुरा, वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

परळी ते शेगाव, मालेगाव ते म्हाडा अन् रामटेक ते बारामती; राज्यातील दुष्काळाची स्थिती काय? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Purandar Fort : ४,४७२ फूट उंचीवर वसलेला भव्य पुरंदर किल्ला, गडाबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Tata Aeris Launched: खुशखबर! ₹5.29 लाखांत आली टाटाची नवी कार, फीचर्सही जबरदस्त

SCROLL FOR NEXT