Buldhana Accident News
Buldhana Accident News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident News: टँकर आणि ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा आगीत होरपळून मृत्यू

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Accident News: बुलढाण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. सोलापूर-इंदोर राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर दुधाचे टँकर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. या आगीत दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर या अपघातात ट्रक चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील मलकापूर रोडवर दाताळाजवळ उत्तर फाट्यानजीक दूधाचा टँकर आणि नारळाचा ट्रक यांच्यात भीषण टक्कर होऊन मोठा अपघात झाला आहे.

बुलढाण्यातील हा भीषण अपघात रात्री 8.30 वाजे दरम्यान झाला आहे.या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. टँकर आणि ट्रकमध्ये धडक झाल्यानंतर ट्रकने अचानक पेट घेतला. आगीत होरपळून ट्रकचा चालकाचा जागेवर मृत्यू झाला आहे.

या भीषण अपघातामुळे मलकापूर आणि बुलढाणा मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. मलकापूर नगर परिषदेचे अग्निशमन वाहन आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. दूधाचा टँकर हा अमर डेअरीचा होता तर दुसरा ओल्या नारळाचा ट्रक असून तो ट्रक राजस्थानमधील असल्याचे समजते.

घटनास्थळी मलकापूर पोलीस पोहोचली असून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहानाच्या 3 ते 4 किमीपर्यंत रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत. अग्निशमनच्या या मदतीने आग विझविण्यात येत आहे.

अपघातानंतर पाहण्याऱ्यांची एकच गर्दी झाली आहे, तर अपघातस्थळी अंधार असल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला करण्याच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. काही तासात हा मार्ग मोकळा केल्या जात असल्याचे पोलीस सांगत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संतापले

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT