Two killed and seven injured in Deulgaon Raja Buldhana clash 
महाराष्ट्र

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

Shiv sena Corporator Killed In Buldhana : बुलढाण्यातील देऊळगाव राजा शहरात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सात जण जखमी असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

Bharat Jadhav

  • देऊळगाव राजा शहरात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी

  • मृतांपैकी एक जण शिंदे गटाच्या शिवसेनेचा नगरसेवक आणि दुसरा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता

  • जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले

संजय जाधव,साम प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीत दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत झालेले दोघेही राजकीय पक्षासंबंधीत आहेत. यातील एकजण शिंदे सेनेचा नगरसेवक आहेत तर एकजण अजित पवार गट राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे.

हाणामारीच्या घटनेत सात जण जखमी झाल्याची माहिती असून जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. देऊळगाव राजा शहरात झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नेमका वाद कशामुळे झाला, हल्ल्यात कोण सहभागी होते आणि मृत व जखमींची अधिकृत ओळख काय, याचा तपास सुरू आहे.

कव्वालीच्या कार्यक्रमातील वादातून राडा?

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या गेटजवळच हा राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही बाजूंनी तलवारी आणि इतर धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, काल देऊळगाव राजा शहरातील एका परिसरात कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बसण्याच्या जागेवरून काही लहान मुलांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर हा वाद मोठ्यांमध्ये पोहोचला आणि आज त्याचे रूप हाणामारीत झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT