Buldhana Crime News Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: कारची काच फोडली अन् क्षणार्धात लाखोंची रोकड लांबविली; चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद

Buldhana Crime News: मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून चोरट्यांनी भरदिवस ९ लाखांची रोकड पळवली.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

Buldhana Mehkar Robbery CCTV Video

बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून चोरट्यांनी भरदिवस ९ लाखांची रोकड पळवली आहे. शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी संतोष मदनलाल लद्दड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे. गेल्या महिनाभरात अशाप्रकारची ही सहावी घटना असल्याने बुलढाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष लद्दड शिक्षक असून त्यांनी शुक्रवारी ४ वाजेच्या सुमारास मेहकर येथील स्टेट बँक शाखेतून ९ लाख रुपयांची रोकड काढली होती. ही रोकड घेऊन ते घरी परतत होते. यादरम्यान, संतोष हे देऊळगाव माळी (Buldhana News) येथील एका हॉटेलवर मित्रांसोबत चहा पिण्यासाठी थांबले.

त्यावेळी दोन अज्ञात चोरटे बाइकवरून तिथे आले. कारकडे कुणाचेही लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कारच्या काचा फोडल्या. क्षणार्धात कारमध्ये ठेवलेली ९ लाखांची बँग चोरट्यांनी पळवून नेली. चोरीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

दरम्यान, चहा घेतल्यानंतर संतोष कारजवळ आले असता, घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. बँकेतून रक्कम काढल्यानंतर दोन अज्ञात व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याचं संतोष यांनी पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT