Chikhali Crime Saam tv
महाराष्ट्र

Chikhali Crime: चिखलीत दरोडेखोरांचा धुडघुस; दाम्पत्याला मारहाण, महिला गंभीर जखमी

BUldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे राहत असलेल्या गजानन नवले यांच्या घराचा मागचा दरवाजा तोडून सहा दरोडेखोरांनी रात्रीच्या सुमारास प्रवेश केला. यावेळी गजानन नवले व त्यांच्या पत्नी अलका नवले हे दोघेच घरात होते.

Rajesh Sonwane

संजय राठोड

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात चोरी दरोड्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या चोरीच्या घटना रोखण्यात (Police) पोलिसांना अद्याप यश मिळालेले नाही. याच दरम्यान रात्रीच्या सुमारास चिखली (Chikhali) शहरात दरोडेखोरांनी धुडघूस घालत दाम्पत्याला मारहाण करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे राहत असलेल्या गजानन नवले यांच्या घराचा मागचा दरवाजा तोडून सहा दरोडेखोरांनी रात्रीच्या सुमारास प्रवेश केला. यावेळी गजानन नवले व त्यांच्या पत्नी अलका नवले हे दोघेच घरात होते. दरोडेखोरांनी (Crime News) नवले दाम्पत्याला दागिने आणि पैशाची मागणी केली. याला विरोध केल्याने लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. या दांपत्याने आरडाओरड केल्याने शेजारील लोक जागे झाले. त्यामुळे दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिला गंभीर जखमी 

रात्रीच्या सुमारास सहा दरोडेखोर घरात घुसून त्यांनी केलेल्या मारहाणीत अलका नवले ह्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे शहरात दहशत पसरली असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT