Buldhana Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: बुलडाणा हादरले! शिक्षकाकडून ४ चिमुकलींचा लैंगिक छळ, सिंदखेडराजामधील खळबळजनक घटना

Buldhana Crime News: बुलडाण्यामध्ये चार चिमुकल्या शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील ही घटना आहे. या घटनेमुळे बुलडाणा हादरले आहे.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

बदलापूरमध्ये २ शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आहे. या घटनेनंतर राज्यभरातून लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशामध्ये बुलडाण्यामध्ये चार चिमुकल्या शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील ही घटना आहे. या घटनेमुळे बुलडाणा हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील जिल्हापरिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या चार विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. खुशाल उगले असं या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पोक्सो आणि अॅट्रोसिटीसह विविध कलमानव्ये शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील ही घटना आहे. या घटनेचा बुलडाण्यातील नागरिकांकडून तीव्र निषेध केला जात आहे.

नुकताच बदलापूरची घटना आणि अकोला येथील घटना ताजी असताना बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना पुढे आली आहे. जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यात घडलेल्या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्या नराधम शिक्षकाविरोधात किनगावराजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा शिक्षक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या शिक्षकाच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT