Malkapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Malkapur Crime : दोन गटात जुना वाद उफाळला; युवकाची चाकूने भोसकून हत्या, एकजण गंभीर

Buldhana News : जुन्या वादातून 21 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली असून घटनेनंतर आरोपींना ग्रामस्थानी चागलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांकडून तपास सुरु

संजय जाधव

बुलढाणा : मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर येथे क्षुल्लक कारणातून जुना वाद उफाळून आला. या वादात युवकांचे दोन गट आमनेसामने येत हाणामारीपर्यंत गेले. याच जुन्या वादातून झालेल्या दोन गटाच्या हाणामारीत चाकूने हल्ला करण्यात आल्याने एका २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी लागलीच कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतले.  

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात असलेल्या पिंप्राळा येथील सतीश गजानन झाल्टे आणि अविनाश जितेंद्र झाल्टे या दोघांचा काही दिवसांपूर्वी मलकापूर येथील काही युवकांशी फाट्यावर वाद झाला होता. दरम्यान हे दोघे दर्शनासाठी मलकापूर तालुक्यातील धोपेश्वर मंदिरात आले असता मलकापूर येथील युवक त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी जुने भांडण उकरून काढत तरुणांनी दोघांशी वाद घालण्यास सुरुवात केली. 

वादातून केला चाकू हल्ला 

जुन्या वादातून पुन्हा दोन्ही गटात वाद निर्माण होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत येऊन पोहचले होते. दरम्यान मलकापूर येथील तरुणांच्या गटाने पिंप्राळा येथील दोघांवर चाकूने हल्ला केला. या चाकू हल्ल्यात दोघे ही जमिनीवर पडले असता त्यातील सतीश झाल्टे या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अविनाश झाल्टे हा गंभीर जखमी असून त्याच्या सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

नागरिकांनी चोप देत केले पोलिसांच्या स्वाधीन  

घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेत चाकूने वार करणाऱ्या मलकापूर येथील आरोपी युवकांना चांगलाच चोप दिला. यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तर याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT