Buldhana Crime News saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime News: समलैंगिक शिक्षकाचा तरुणासोबत काढला आक्षेपार्ह व्हिडिओ; बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार

Buldhana Local News Updates : याप्रकरणी ४ जणांविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

Offensive video recorderd of gay teacher with youth in Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे एका २४ वर्षीय शिक्षकाला समलिंगी संबंधाच्या ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून पैसे उकळ्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी शिक्षकाला त्याच्या मित्र असलेल्या तरुणासोबत आक्षेपार्ह व्हिडिओ काढून त्याच्याकडे ४ लाख रुपयांची मागणी करत मारहाण केली.

तसेच शिक्षकाच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे जबरदस्तीने १० हजार रुपये काढून घेतले. बुलडाणा शहरातील गोडे कृषी कॉलेज जवळ ही घडली असून याप्रकरणी ४ जणांविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

चिखली येथील फिर्यादी शिक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याची मैत्री एका अॅपद्वारे बुलडाणा येथील तरुणाशी झाली. त्यानंतर शिक्षक बुलडाणा येथील गोडे कृषी कॉलेज जवळ त्या तरुणाच्या घरी गेला. तेव्हा आरोपींनी शिक्षकाचा तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत व्हिडोओ काढला आणि त्याच्याकडे 4 लाख रुपयांची मागणी केली. (Breaking News)

तसेच पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली. मात्र तेवढ्यात आरोपीमधील एका २५ वर्षीय युवतीने मध्यस्थी करून त्याच्याकडे एवढी रक्कम नाही, तो थोडेफार देऊ शकतो असे सांगून त्याला घेऊन ATM नेले आणि त्याच्या खात्यातून 10 हजार रुपये काढून घेतले. (Crime News)

यासंदर्भात शिक्षकाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा येथील दोन तरुण आणि एखा तरुणीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी असलेल्या दोन तरुणांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT