संजय जाधव, प्रतिनिधी...
Buldhana Crime News: बुलढाणा शहरात एक अजब प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील कुप्रसिद्ध बवाना गॅंगस्टरच्या नावाने पंकज खर्चे नामक या व्यक्तीला तब्बल ४० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसही चक्रावून गेले आहेत. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, केशवनगरमध्ये (Keshavnagar) राहणाऱ्या विमा एजंट असलेल्या पंकज खर्चे (Pankaj Kharche) यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारची मागील काच फोडून एका चिठ्ठीच्या माध्यमातून ही चाळीस लाखाची खंडणी मागण्यात आली आहे.
एवढेच नाही तर पंकज खर्चे यांच्या मावशीच्या घरीदेखील चिठ्ठी पाठवत पंकज खर्चे यांना पैसे द्यायला सांगा, असे सांगण्यात आले. पैसे दिले नाहीतर जीवे मारण्याची धमकीसुद्धा या धमकीतून देण्यात आली आहे. (Buldhana Crime News)
त्यामुळे खरंच खंडणी मागणारे हे दिल्लीतील (Delhi) बवाना गँगचे गँगस्टर आहेत की कोणी आसपाचे आहेत? याचा तपास आता बुलढाणा पोलीस (Buldhana Police) करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण अजब प्रकारामुळे बुलढाणा पोलीसही चक्रावून गेले आहेत. दिल्ली, मुंबईत नेहमी घडणारा प्रकार बुलढाण्यात दिसून आल्याने मात्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.