Chikhli taluka A 23 year old youth ended his life Saam Tv News
महाराष्ट्र

Buldhana Crime : पेट्रोल पंपाजवळ तरुणाने आयुष्य संपवलं, पोलिसांकडून CDR अन् डाटा चेक; संशयाची सुई...

Buldhana Youth Suicide News : नवाब शाह याला तातडीनं उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केले आहेत.

Prashant Patil

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सैलानी नगर येथे राहणाऱ्या २३ वर्षीय नवाब शाह हारुण शाह या युवकानं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चव्हाण पेट्रोल पंपाजवळ बुलढाणा रोडवर रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्याचत आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवाब शाह याला तातडीनं उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केले आहेत. आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरातील लोकांकडे चौकशी देखील सुरू केली आहे. दरम्यान, नवाब शहा याच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक तरुण अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलतो यामुळे मनावर परिणाम करणाऱ्या गोष्टींबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पोलिसांनी नवाबच्या मित्रांसोबतच कुटुंबीयांची देखील चौकशी सुरू केली असून त्याच्या मोबाईलमधील संभाषण आणि सोशल माध्यमांवर देखील हालचालींची तपासणी केली जात आहे.

राज्यात एकाच दिवशी ३ तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील खेड, पिंपरी-चिंचवड, आणि मावळ या तिन्ही वेगवेगळ्या भागांमध्ये पाण्यात बुडून तीन युवकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे संबंधित परिसरात शोककळा पसरली आहे. खेड तालुक्यात २६ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. तर, पिंपरी चिंचवडमध्ये नदीपात्रात बुडून एका २९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. मावळमध्येही एका १३ वर्षीय युवकाचा बुडून मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

खेड तालुक्यातील भरणे येथील चोरद नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. देवेंद्र दिलीप राणे असे युवकाचे नाव असून, शिवसेना शिंदे गटाच्या खवटी विभागप्रमुख दिलीप राणे यांचा तो मुलगा आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राणे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या घटनेने तुळशी गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT