Buldhana Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, पिकअप उलटून दोघांचा जागीच मृत्यू; २३ जण गंभीर जखमी

Buldhana Accident: बुलडाण्यात भरधाव पीकअप उलटून भयंकर अपघात झाला. या अपघातामध्ये २ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण गंभीर जखमी झाले. देवदर्शनाला जाताना ही घटना घडली.

Priya More

बुलडाण्यात भीषण अपघात झाला. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या पिकअपने जाणाऱ्या बागवान कुटुंबावर काळाने झडप घातली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर २३ जण गंभीर जखमी झाले. मेहकरजवळ नांद्रा फाट्यावर ही घटना घडली. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर तालुक्यातील नांद्रा फाटा येथे आज सकाळी हा भीषण अपघात झाला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे राहणारे बागवान कुटुंबीय बुलडाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात होते. हे सर्वजण पिकअपने निघाले होते पण सैलानी बाबांच्या दर्शनापूर्वीच भयंकर घटना घडली. नांद्रा फाटा येथे पिकअप उलटला. या अपघातामध्ये ३० जण गंभीर जखमी झाले होते. यामधील गंभीर जखमी झालेल्या दोघांनी जागीच प्राण सोडले.

अपघातामध्ये जखमी झालेल्या २३ प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बागवान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातामध्ये अरमान शरीफ बागवान (वय १६ वर्षे) आणि रिहान सैदु बागवान (वय १७ वर्षे) या दोघांचा मृत्यू झाला. हे दोघे लातूरच्या अहमदपूर येथे राहणारे होते. तर इतर प्रवासी गंभीर आणि किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT