Buldhana Accident
Buldhana Accident Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident : भरधाव वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; नातेवाईकांसह गावकऱ्यांचा महामार्गावर ठिय्या

संजय जाधव

बुलढाणा : अवैध वाळू वाहतूक जीवावर बेतत आहे. चोरून वाळू वाहतूक करणारे वाहन भरधाव वेगाने चालविले जातात. (Buldhana) अशाच प्रकारे वाळू वाहतूक करणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवकाचा जागीच (Death) मृत्यू झाला. हि घटना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार- मंठा मार्गावर घडली आहे. (Maharashtra News)

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार- मंठा मार्गावरील अजीसपुर गावाजवळ हा अपघात घडला असून यात अज्ञात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाने शिराज आयुब शेख (वय २४) या युवकास जोरदार धडक दिली. या अपघातात या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून (Accident) अपघातानंतर सदर वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला आहे. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी लोणार ते मंठा हा महामार्ग अजीजपुर जवळ अडवलेला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तीन तासापासून महामार्गावर ठिय्या 

घटनास्थळी पोलीस (Police) दाखल झाले असून जोपर्यंत अवैध रेती वाहतूक करणारे वाहन पोलीस शोधत नाही; तोपर्यंत शिराज आयुब शेख या युवकाचा मृतदेह घटनास्थळावरून उचलणार नाही. अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. मागील तीन तासापासून महामार्गावर युवकाच्या नातेवाईकांसह संपूर्ण गावकरी ठिय्या देऊन आहे. यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesl Rate (14th May 2024): मेगा सिटीमध्ये पेट्रोल डिझेल महाग की स्वस्त ;जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Blood Pressure: उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी चहा प्यावा की नाही?

Today's Marathi News Live : पुण्यात मतदानादरम्यान 57 ईव्हीएम मशीन बदलले

Traffic On Yamunotri Gangotri Expressway: यमुनोत्री, गंगोत्री महामार्गावर वाहतूक कोंडी; महाराष्ट्रातील भाविक १०-१३ तासांपासून अडकले

Reliance Jio: ३३६ दिवस चालणारा स्वस्त रिचार्ज प्लान; डेटा, कॉलिंगसह मिळेल OTT लाभ

SCROLL FOR NEXT