Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : भरधाव रेतीच्या डंपरने झाडाखाली बसलेल्या दोघांना चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Buldhana News : पंधरा दिवस अगोदरच तालुक्यातील माऊली फाट्यावर एका डंपरनेच्या अपघातात दोन चिमुकले व आजींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. डंपरमुळे होणारे अपघात थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे

संजय जाधव

बुलढाणा : वाळू वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर सुसाट वेगाने पळविले जातात. यामुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात आज सकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने झाडाखाली बसलेल्या दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

अवैध्य गौण खनिज आणि वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे होणारे अपघात जळगाव जामोद् तालुक्यात थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. पंधरा दिवस अगोदरच तालुक्यातील माऊली फाट्यावर एका डंपरनेच्या अपघातात दोन चिमुकले व आजींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी असतानाच पुन्हा जळगाव जामोद तालुक्यातील दादुलगाव येथे एका डंपरने दोन इसमांना चिरडल्याची घटना घडली आहे.

दोघेही गंभीर जखमी 

बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव कडून येणाऱ्या टिप्परवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दादुलगाव बसस्थानक परिसरात झाडाखाली बसलेल्या दोन इसमांना चिरडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात दादुलगाव येथील काशिनाथ झाल्टे (वय ४०) व समाधान काळे (वय ५५) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

संतप्त जमावाने पेटविला डंपर 

दरम्यान मागील अपघाताच्या घटनेत संतप्त जमावाने माऊली फाटा येथे डंपरला आगीच्या स्वाधीन केले होते. आजच्या घटनेनंतर देखील जमाव संतप्त झाला होता. या संतप्त जमावाने दादुलगाव येथील अपघातग्रस्त डंपरला सुद्धा आग लावून पेटवल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने चालणाऱ्या या  डंपरवर स्थानिक पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT