Buldhana Accident Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Accident News : बाप मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटायला गेला तो परतलाच नाही; वाटेतच काळाच घाला...

Father Passed Away At Daughter Marriage : मुलीच्या लग्नात संपूर्ण घरात आनंद असताना या आनंदात मिठाचा खडा पडला आहे.

Ruchika Jadhav

संजय जाधव

Buldhana News : बुलढाणा येथून काळीज पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. मुलीच्या लग्नात संपूर्ण घरात आनंद असताना या आनंदात मिठाचा खडा पडला आहे. वडील आपल्या लेकीच्या लग्नाचे आमंत्रण घेऊन घरोघरी फिरत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. (Accident News)

मोताळा तालुक्यातील कुरहा गोतमारा येथील काशीराम मंझा हे आपल्या मुलीच्या लग्नाच्या (Weeding) पत्रिका वाटून घरी परत येत असतांना त्यांना बुलढाणा - मलकापूर रोडवरील पेपर मिल जवळील वळणावर सायंकाळी ट्रक ने धडक दिली. यामध्ये काशिराम मंझा हे जागीच ठार झालेत. मृतक काशिराम मंझा यांच्या मुलीच्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती. लग्न ऐन 2 दिवसावर म्हणजे 27 एप्रिलला आहे.

काशीराम मंझा मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून आपल्या दुचाकी वाहनाने परत येत असतांना मुर्ती फाटा दरम्यान बुलढाणाकडे जाणाऱ्या ट्रक आणि मंझा यांच्या दुचाकीची भिषण धडक झाली. यामध्ये काशीराम मंझा यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

घरात एकीकडे लग्नाची लगबग सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडलीये. वडिलांना (Father) अशा पद्धतीने निरोप द्यावा लागेल याची या मुलीला काहीच कल्पना नव्हती. आपल्या वडिलांच्या निधनाने तिच्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळा आहे. तसेच संपूर्ण गावात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT