Buldhana Accident News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident News: भरधाव डंपरने विद्यार्थी असलेल्या रिक्षाला उडविले; एका विध्यार्थाचा मृत्यू, चार जखमी

Buldhana News: भरधाव डंपरने विद्यार्थी असलेल्या रिक्षाला उडविले; एका विध्यार्थाचा मृत्यू, चार जखमी

Rajesh Sonwane

संजय जाधव 

बुलढाणा : सकाळची शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या लहान विद्यार्थ्यांच्या रिक्षाला रेतीने भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत (Accident) रिक्षा दूरवर फेकली गेली असून यात एका विद्यार्थ्यांचा (Buldhana) मृत्यू झाला आहे. तर चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा थरकाप उडविणारा अपघात बुलढाणा- नांदुरा मार्गावर घडला आहे. (Maharashtra News)

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या डंपर भरधाव वेगाने पडवीले जात असतात. यामुळे अनेक अपघात देखील झाले आहेत. परंतु या भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर चालकांवर कोणतीही कारवाई होत नाही. रिक्षा किंवा व्हॅनमधून विद्यार्थी (Student) रोज ये-जा करत असतात. अशाच विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला डंपरने जोरदार धडक देत उडविले. नांदुरा- बुलढाणा मार्गावरील टाकरखेडजवळ हा अपघात झाला आहे. रिक्षामध्ये असलेले सर्व विद्यार्थी हे केजी १ व पहिल्या वर्गातील असल्याची माहिती समोर आली आहे.  


एक ठार, दोघांची प्रकृती गंभीर 
डंपरने रिक्षाला दिलेल्या धडकेत एक विद्यार्थी ठार झाला आहे. आदित्य मुकुंद असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तर चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर नांदुरा येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत. जखमी विद्यार्थ्यांमध्ये दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक झाले आहेत. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT