Buldhana Crime News saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime News : गुटखा, कारसह सव्वा सात लाखांचा मुद्देमाल जप्त, बुलढाणा जिल्ह्यात एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

वाहनामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसालाचा माल असल्याने पाेलिसांनी वाहन चालकास ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे आणले.

Siddharth Latkar

Buldhana News :

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर दसरखेड पोलिसांनी हरसोडा फाट्यावर गुटखा घेऊन जाणाऱ्या कारसह ७ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रात्रीच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली आहे. (Maharashtra News)

एमआयडीसी पोलिस मध्यरात्रीनंतर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पांढऱ्या रंगाची कार ही अवैधरित्या गुटखा भरून कु-हा गावाकडुन धुपेश्वर मार्गे हरसोडा रोडने जाणार आहे अशी खबर मिळाली होती.

त्यावरून पोलिसांनी तात्काळ हरसोडा फाटा येथे सापळा लावला. रात्री १.४५ वाजताचे सुमारास कार वेगाने धुपेश्वर रोडकडुन हरसोडा रोडने येताना दिसले. वाहनाला हरसोडा फाटयावर प्राथमिक शाळेजवळ थांबविले.

वाहनामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसालाचा माल असल्याने पाेलिसांनी वाहन चालकास ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे आणले. तसेच पंचाना बोलावुन पंचासमक्ष व वाहन चालक व एक व्यक्ती यांच्या समोर वाहनाची पाहणी करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कारवाईत कार ५ लाख रूपये, २ लक्ष २९ हजार ८८० रुपयाचा गुटखा माल असा एकूण ७ लाख २९ हजार ८८० रुपयाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT