Buldhana Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: घराकडे जाताना भयंकर घडलं, भरधाव वाहनाने ३ जिवलग मित्रांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू

Buldhana Accident: बुलडाण्यामध्ये भयंकर रस्ते अपघातामध्ये दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. तिघे जिवलग मित्र दुचाकीवरून घराकडे जात होते. त्याचवेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

Priya More

Summary -

  • बुलडाण्याच्या जळगाव जामोद परिसरात भीषण अपघात

  • भरधाव वाहनाने ३ जिवलग मित्रांना चिरडलं

  • अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला

  • एक तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. बुलडाण्याच्या जळगावमध्ये ही घटना घडली. ३ जिवलग मित्र दुचाकीवरून घरी जात असताना अपघाताची ही घटना घडली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जामोद गावातील ३ जिवलग मित्र दुचाकीवरून धरण ते सुनगाव रस्तावरून जात होते. त्याचवेळी सुनगाव शिवारात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपपघातामध्ये तिघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर या वाहनाने तिघांनाही चिरडलं. या अपघातामध्ये दोघांनी जागीच प्राण सोडले. तर एक तरुण गंभीर जखमी झाला.

या अपघातामध्ये विवेक भगत आणि गौरव बांधीरकर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा तरुण गंभीर जखमी झाला. या तरुणावर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. जामोद गावातील मनमिळाऊ स्वभाव असलेल्या तसेच सर्वांच्या परिचित असणाऱ्या या तरुणांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. सध्या बुलडाणा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कायद्याच्या राज्यात धावत्या बसमध्ये दरोडे; प्रवाशांची लूटमार कधी थांबणार?

मोठी बातमी: ५०० खोक्यांवर विधान करणं काँग्रेस महिला नेत्याला भोवलं! नवज्योत कौर सिद्धूचं थेट निलंबन

IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

SCROLL FOR NEXT