Dhule : भरदिवसा रस्त्यात तरुणाचा निर्घृण खून
Dhule : भरदिवसा रस्त्यात तरुणाचा निर्घृण खून भूषण अहिरे
महाराष्ट्र

Dhule : भरदिवसा रस्त्यात तरुणाचा निर्घृण खून

भूषण अहिरे

धुळे : पोळा सणाचे औचित्य साधून शोरुम मधुन नवीन मोटरसायकल घरी आणत असतांना तरुणाचा अज्ञात संशयितांनी धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून करून, नवीन मोटरसायकल घेऊन पोबारा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 21 वर्षीय प्रेमसिंग गिरासे असे या मृत तरुणाचे नाव आहे. घरातील कर्ता एकुलत्या एक मुलाचा मृत्यूची घटना समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

यासंदर्भात प्रेम सिंग गिरासे या तरुणाच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी चिमठाणे फाटा या ठिकाणी एकत्र जमून रास्तारोको केला आहे. तरुणाच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी. या मागणीसाठी हा रास्ता रोको ग्रामस्थांतर्फे करण्यात आला आहे. घटनेची माहिती कळताच धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित हे घटनास्थळी दाखल झाले आणि ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला.

हे देखील पहा-

परंतु, नागरिकांचा रोष हा पोलीस प्रशासनावर देखील कायम असल्याचे या रास्तारोको दरम्यान बघायला मिळाले आहे. यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी संतप्त ग्रामस्थांना मारेकऱ्यांना पकडण्याचे आश्वासन देत असताना जर मी मारेकर्‍यांना पकडले नाही, तर मी पोलीस अधीक्षक पदाचा राजीनामा देईल असे भावनिक आवाहन देखील करत ग्रामस्थांना रास्तारोको थांबविण्याचे आवाहन केले आहे.

यानुसार शिंदखेडा तालुक्यातील दरणे येथील प्रेमसिंग राजेंद्र गिरासे हा (वय-21) वर्षीय तरुण शिंदखेडा येथील शोरुम मधून नवीन प्लाटीना मोटरसायकल घेण्यासाठी गेला होता. पोळा सणाच्या दिवशी मोटरसायकल घेऊन घरी परत येत असतांनाच, दरणे ते चिमठाणे रस्त्यावर सबस्टेशन जवळ संशयितांनी त्याचा रस्त्यातच धारदार शस्त्राने वार करत खून करून नवीन मोटरसायकल घेऊन अज्ञात संशयित पोबारा केला आहे.

प्रेमसिंग गिरासे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे ये- जा करणाऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर उपस्थितांनी तात्काळ जवळील चिमठाणे येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापत असल्याचे बघुन धुळे या ठिकाणी पुढील उपचारास जाण्याचा सल्ला दिला. तेथून धुळेकडे जात असतांनाच रस्त्यावरच प्रेमसिंग गिरासे यांचा मृत्यू झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Pandey News : माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंची निवडणुकीतून माघार, गायकवाड आणि निकमांना दिल्या शुभेच्छा

Sanjay Raut: महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढ्यात शिवसेना नेहमीच पुढे; संजय राऊतांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Today's Marathi News Live : महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर अखेरच्या दिवशी अर्ज भरणार

Mumbai Local News | मुंबईत लोकलमधून पडून 139 जणांचा बळी, धक्कादायक माहिती समोर

Hardik Pandya Statement: मुंबई इंडियन्सचं चुकतंय तरी कुठं? गोल्डन डकवर बाद होणाऱ्या हार्दिकने सांगितलं पराभवाचं कारण

SCROLL FOR NEXT