जावयाने सासूच्या डोक्यात फरशी घालून आणि चाकूने वार करत केली निर्घृण हत्या; कारण ऐकाल तर व्हाल थक्क लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

जावयाने सासूच्या डोक्यात फरशी घालून आणि चाकूने वार करत केली निर्घृण हत्या; कारण ऐकाल तर व्हाल थक्क

पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने चक्क डोक्यात फरशी आणि चाकूचे वार करून सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने चक्क डोक्यात फरशी आणि चाकूचे वार करून सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील प्रियदृशनी कॉलनी जवळील संभाजीनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

सखुबाई काळे (वय- 50) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत्यू झालेल्या महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विजय किसन धिल्लोड (वय-35) राहणार भावसिंगपुरा औरंगाबाद याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे.

ज्योती विजय धिल्लोड हिने दिलेल्या फिर्यादी नुसार मागील काही दिवसांपासून ती मुलासह माहेरी आली असताना पती विजय याने नांदायला पाठवा म्हणत सासूशी वाद घालत सासूच्या डोक्यात फरशी घातली आणि चाकूने वार करून हत्या केल्याची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तोंड फुगलेला आणि मोठा दिसतोय? फेस फॅट कमी करण्यासाठी घरीच करा 5 सोपे योगा

Maharashtra News Live Update: अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय

Weight Loss : जेवणातला 'हा' छोटासा पदार्थ वजन झटपट करेल कमी, रोज सकाळी रिकाम्या पोटी खा

पुण्यात पहाटेच गोळीबाराचा थरार! पोलिस-गुन्हेगार आमने-सामने; नेमकं काय घडलं?

Ladki Bahin Yojana: वटपौर्णिमेला लाडकीच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये? जून महिन्याच्या हप्ताबद्दल मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT