Police investigate the brutal daylight murder of former corporator Mangesh Kalokhe in Khopoli, sparking political outrage across Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा बिहार होतोय? क्रूर हत्येनं खोपोली हादरली

Political Rivalry Turns Deadly In Khopoli: नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निघृण हत्या करण्यात आली...मात्र याचं राजकीय आरोप- प्रत्यारोप होतोय... पराजयाचा बदला घेण्यासाठी हत्येचा सूड उगवण्यात आल्याचं बोललं जातयं...

Snehil Shivaji

ज्या घरात ४ दिवसांपुर्वी आनंद होता, ज्या घरात 4 दिवसांपुर्वी एकमेंकाचं तोंड गोड करण्यात येत होतं ज्या घरात विजयाचा जल्लोष होता त्याच घरात आज स्मशानशांतता आहे. रायगडच्या खोपोलीत सकाळी झालेल्या हत्याकांडान राजकीय वैर किती टोकाचं असू शकतं त्याचा अंदाज लावता येईल. कारण नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणूकीत निवडून आलेल्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पती सोबत जे घडलं त्यानं क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्या..

माजी नगरसेवक मंगेश काळोखेंची हत्या

सकाळी मुलांना शाळेत सोडून परतताना हल्ला

धारदार शस्त्रानं 4-5 अज्ञातांचा काळोखेंवर हल्ला

जीवघेण्या हल्ल्यात काळोखेंचा जागीच मृत्यू

हत्येनंतर हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून फरार

मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक असून खोपोलीत सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख. नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगरपालिका निवडणूकीत प्रभाग २ मधून त्यांनी प्रचारात आघाडी घेत पत्नी मानसी काळोखे यांना शिंदेगटाच्या तिकीटावर राष्ट्रवादीच्या उमेदवारावर मात करत निवडून आणलं. त्यांच्या विजयाची जिल्ह्याभरात चर्चा सुरु असतांना ही हत्या झाल्यानं शिंदेगटाचे मंत्री भारत गोगावलेंनी थेट राष्ट्रवादीवरच हत्येचा आरोप केलाय

मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर खोपोलीत खळबळ माजलीये. शिवसैनिकांनी खोपोली बंदचं आवाहन करत जो पर्यंत पोलिस मारेकऱ्यांना अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत मोर्चा काढून पोलिस ठाण्यात ठिय्या दिलाय. राजकीय वैमनस्यातून जर ही हत्या झाली असेल तर महाराष्ट्राचा बिहार होतोय का हा खरा प्रश्नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT