Brutal Attack on Khokya Bhosales Family Saam
महाराष्ट्र

खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, ५ महिलांवर कोयता अन् कुऱ्हाडीनं वार; नेमकं कारण काय?

Brutal Attack on Khokya Bhosales Family: बीडच्या शिरूरमध्ये खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला. हल्लखोरांनी धारदार शस्त्राने महिलांवर हल्ला केला.

Bhagyashree Kamble

  • खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला.

  • या हल्ल्यात ५ महिला जखमी.

  • जखमी महिलांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक खळबळजक प्रकार उघडकीस आला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने हा प्राणघातक हल्ला केला आहे. अज्ञात टोळक्यांनी केलेल्या भीषण अपघातात चार महिला गंभीर जखमी झाले आहेत. तर, एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सध्या खोक्या भोसलेच्या कुटुंबातील सदस्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

ही धक्कादायक घटना शिरूर कासार तालुक्यातील तहसील कार्यालयासमोरील गायरान परिसरात घडली. मध्यरात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. गायरान परिसरात १० ते १५ जणांची टोळी पारधी वस्तीवर आली. अज्ञात टोळक्यांनी मिळून खोक्या भोसलेच्या कुटुंबावर हल्ला चढवला.

अज्ञात टोळक्यांनी कोयते, दांडके आणि कुऱ्हाडीने वार केले. या भीषण हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे. अज्ञात टोळक्यांनी विशेषत: खोक्या भोसलेच्या कुटुंबातील महिलांवर हल्ला चढवला. अमानुष हल्ला चढवल्यानंतर पीडित महिलांनी शिरूर पोलील ठाणे गाठले.

शिरूर पोलीस ठाणे गाठत त्यांनी अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. सध्या जखमी महिलांवर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 'अनेक वेळा सांगूनही या जागेवर का राहता?', असा प्रश्न उपस्थित करत अज्ञात हल्लेखोरांनी खोक्या भोसलेच्या कुटुंबातील महिलांवर हल्ला केला. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

इंजिनमध्ये बसून मशालीने विरोधकांना जाळू; राज ठाकरेंचा महायुतीवर घणाघात

SCROLL FOR NEXT