Breaking : प्रतिभावंत लेखक द.मा.मिरासदार काळाच्या पडद्याआड!  SaamTvNews
महाराष्ट्र

Breaking : प्रतिभावंत लेखक द.मा.मिरासदार काळाच्या पडद्याआड!

मराठी साहित्यातील नामवंत लेखक, मराठी विषयाचे प्राध्यापक, कथाकथनकार म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारे प्रा.द. मा. मिरासदार यांचे आज वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : मराठी साहित्यातील नामवंत लेखक, मराठी विषयाचे प्राध्यापक, कथाकथनकार म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारे प्रा.द. मा. मिरासदार यांचे आज वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. द. मा. मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी झाला होता. मिरासदार यांच्या साहित्य सेवेची सुरुवात पत्रकारितेतून झाली, साहित्याच्या याच झऱ्याने पुढे व्यापक रूप धारण केले.

पुण्यामध्ये पत्रकाराच्या भूमिकेत काही वर्षे काम केल्यानंतर ते अध्यापन क्षेत्राकडे वळले. 1961 ते 1987 या काळात त्यांनी औरंगाबाद मधील देवगिरी महाविद्यालय आणि पुण्यातील गरवारे वाणिज्य महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य केले. मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अमाप विद्यार्थीप्रेम मिळवले.

त्यांच्या साहित्याने सामान्य वाचकांबरोबर जाणकार समीक्षकांचीही दाद मिळावली आहे. साहित्याच्या क्षेत्राप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या लेखणीचा संचार लक्षणीय ठरला. कथासंग्रहाप्रमाणे त्यांच्या पटकथा संवादांना ही शासकीय पारितोषिकांचा मान मिळाला आहे. कथाकथन हा महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला नवा कलाप्रकार लोकप्रिय करण्यात मिरासदारांचा सिंहाचा वाटा आहे.

प्राध्यापक द.मा.मिरासदार यांचे निधन वृत्त समजले अतिशय दुःख झाले. मराठीतील एक अतिशय नामवंत लेखक, मराठीचे प्राध्यापक, कथाकथनकार म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती.शंकर खंडू पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि मिरासदार सर यांचे कथा कथनकाचे कार्यक्रम अनेक वेळा पाहण्याचा योग आला त्यातील मजा ही काही औरच होती. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली मी बरीच पुस्तके वाचली भोकरवाडीच्या गोष्टी, फुकट, बेंडबाजा, मिरासदारी, भुताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, अशा अनेक पुस्तकांचा समावेश करावा लागेल. 14 एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी 1927 साली त्यांचा जन्म झाला आज 94 व्या वर्षी ते आपल्याला सोडून गेले. गेली अनेक वर्ष ते सार्वजनिक जीवनात दिसले नाहीत. प्राध्यापक मिरासदार सरांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली !
शरद पवार

अश्या शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मिरासदार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : चेहऱ्यावरील सूज कशी कमी करावी? जाणून घ्या घरगुती उपाय

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! तेजस, अमृत भारतसह १२ ट्रेनच्या टायमिंगमध्ये बदल; प्रवास करण्याआधी नवे वेळापत्रक वाचा

Maharashtra Live News Update : रत्नागिरीत शिवसैनिकांनी वाहीली अजित पवार यांना श्रद्धांजली

Winter Skin Care : गुलाबी गाल अन् कोमल त्वचा हवीय? मग ताक वापरून वाढवा सौंदर्य

Blouse Neck Designs: ब्लाऊजच्या गळ्याची हटके डिझाईन, या आहेत ट्रेडिंग 5 स्टाईल्स

SCROLL FOR NEXT