omicron
omicron Saam Tv
महाराष्ट्र

Breaking : जुन्नर मध्ये Omicron चे सात रुग्ण आढळले; तालुक्यात खळबळ!

रोहिदास गाडगे

जुन्नर : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junnar) तालुक्यातील वारूळवाडी व नारायणगाव येथील एकूण ७ जणांना ओमायक्रॉनची (Omicron) लागण झाल्याचे उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. नारायणगाव वारुळवाडी येथील 16 रहिवासी दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून ते परत आल्यानंतर 12 डिसेंबरला 16 जणांचे RTPCR नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते.

17 डिसेंबर रोजी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेच्या (NIV) अहवालानुसार हे सर्व जण ओमायक्रॉन बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे या सर्व रुग्णांचे लसीकरण (Vaccination) झाल्याची माहिती समोर येत आहे. यातील 5 जणांचे कोविशील्ड (covishield) चे दोन्ही डोस पूर्ण असून उर्वरित दोघांनी एक डोस घेतला आहे. सर्व रुग्णांना नारायणगाव (Narayangaon) ग्रामीण रुग्णालयात विलगीकरणात ठेण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील नातेवाईक व इतर नागरिकांची RTPCR तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यात ओमायक्रॉनने दहशत निर्माण केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: तेरणा कारखान्यातील भंगारावरुन तानाजी सावंतांचा ओमराजेंवर निशाणा, व्यंगचित्र समाज माध्यमात व्हायरल

Today's Gold Silver Rate : चांदीच्या दरात प्रति किलो ०६ हजारांची घट, सोनंही स्वस्त झालं; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदी

Konkan Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची गावाकडे जायची सोय झाली; रेल्वे तिकीट बुकिंगबाबत मोठी अपडेट

Viral Video: शाळेतील विद्यार्थ्यांची बीटबॉक्सिंगवर अनोखी जुगलबंदी; हुबेहूब आवाज काढत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Breakfast Recipe: झटपट बनवा 'हा' स्वदीष्ट नाश्ता; घरातलेही करतील वाह वाह

SCROLL FOR NEXT