Gunaratna Sadavarte SaamTV
महाराष्ट्र

Gunratna Sadavarte News: गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का! एसटी बँकेतील सत्ता धोक्यात; १५ संचालक पाठिंबा काढून घेणार?

Gunratna Sadavarte News: वकिल गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका बसणार आहे. गुणरत्न सदावर्तेंची एसटी बँकेतील सत्ता अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. एसटी कर्मचारी बँकेतील 15 संचालक पाठिंबा काढून घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर |ता. ८ डिसेंबर २०२३

Gunratna Sadavarte News:

नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असणारे वकिल गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका बसणार आहे. गुणरत्न सदावर्तेंची एसटी बँकेतील सत्ता अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. सदावर्तेंच्या एकाधिकारशाहिला कंटाळून एसटी कर्मचारी बँकेतील 15 संचालक पाठिंबा घेणार काढून घेणार असल्याचा खळबळजनक दावा माजी जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केला आहे. या संचालकांचा प्रवक्ता म्हणून बाजू मांडत असल्याचेही ते म्हणालेत.

काय म्हणाले संतोष शिंदे?

गुणरत्न सदावर्ते यांना बँकेचे मार्गदर्शक म्हणून आम्ही स्वीकारले होते. मात्र ते आता मालक व्हायला चालले आहेत. याला आता एसटी जनसंघाने विरोध दर्शविला असून बँकेचे 19 पैकी 11 संचालक सदावर्ते यांच्या विरोधात एकवटले असल्याची माहिती एसटी कामगार नेते संतोष शिंदे यांनी दिली आहे.

तसेच "गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील आणि त्यांचे मेव्हणे सौरभ पाटील यांच्या वादग्रस्त कारभारावर बोट ठेवत त्यांची लवकरच हकालपट्टी करणार असल्याचेही ते म्हणाले. सदावर्ते यांनी पैसे घेऊन आणि बेकायदेशीर रित्या नोकरभरती केली असून जयश्री पाटील या मनमानी कारभार करत आहेत," असल्याचा आरोपही यावेळी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांचे मेव्हणे सौरभ पाटील यांची सुद्धा बँकिंग क्षेत्रात कोणतेही ज्ञान नसताना त्यांची नियुक्ती बँकेच्या उच्च अधिकारीपदी नियुक्ती करून एक नवा वाद निर्माण केला आहे. याचीही चौकशी होईल असे सांगत आम्ही इतर सर्वजण जनसंघ म्हणून आता एकत्रच राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचारी बँकेतील १९ पैकी १४ संचालक नॉटरिचेबल झाल्याचीही बातमी समोर आली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT