Sharad Pawar In Ahmednagar  google
महाराष्ट्र

Sharad Pawar: 'निकालानंतर नेत्यांशी चर्चा, उद्या दिल्लीत बैठक', शरद पवारांनी सांगितली पुढची रणनिती!

Sharad Pawar Press Conference: राज्यातील उमेदवारांची विजयी घौडदौड सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मतदारांचे आभार मानत शरद पवार यांनी महाराष्ट्र परिवर्तनाच्या दिशेने असल्याचे सूचक व्यक्त केले आहे.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, मुंबई, ता. ४ जून २०२४

राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. राज्यात तब्बल ३० जागांवर महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. राज्यातील उमेदवारांची विजयी घौडदौड सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मतदारांचे आभार मानत शरद पवार यांनी महाराष्ट्र परिवर्तनाच्या दिशेने असल्याचे सूचक व्यक्त केले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

महाराष्ट्रातील जनतेचे, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार. देशातील चित्र आशादायक आहे. महाराष्ट्रापेक्षा उत्तरप्रदेशमध्ये वेगळे निकाल लागले. आज निकाल आल्यानंतर मी काही नेत्यांशी चर्चा केली. उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. त्यासाठी आम्ही जाऊ, आम्ही १० पैकी ७ जागांवर पुढे आहेत. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

"आज निकाल आल्यानंतर मी काही नेत्यांशी चर्चा केली. उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. त्यासाठी आम्ही जाऊ, मी चंद्राबाबूंशी बोललो त्यात तथ्य नाही. मी केवळ काँग्रेस नेत्यांशी बोललो, असे म्हणत शरद पवार यांनी इंडिया आघाडीची पुढील रणनिती स्पष्ट केली.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी बारामतीच्या निकालावरही महत्वाचे भाष्य केले. बारामतीत यापेक्षा निकाल वेगळा लागेल, असं मला वाटल नव्हत. बारामतीमधील सर्वसामान्य लोकांची मानसिकता मला माहिती आहे… आम्ही तिथे जाऊ किंवा नाही पण ते आमच्या सोबत आहेत. विधानसभेत आम्ही सामूहिक कष्ट करु, हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे.. असेही शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT