Sharad Pawar Vs Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ब्रेकिंग! अजित पवारांसह ४१ आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; सेना- राष्ट्रवादीच्या सुनावणीबाबत घेतला मोठा निर्णय

NCP MLA Disqualification Case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची याचिका एकाच दिवशी ऐकू असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांसह त्यांच्यासोबत केलेल्या आमदारांना नोटीस जारी केली आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. २९ जुलै

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची याचिका एकाच दिवशी ऐकू असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांसह त्यांच्यासोबत केलेल्या आमदारांना नोटीस जारी केली आहे. यावर तीन सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. या याचिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.

आजच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने शिवसेना आमदार अपात्र प्रकरण आणि राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरण एकाच दिवशी ऐकू असे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. पुढची सुनावणी एकापाठोपाठ ऐकू असे म्हणत कोर्टाकडून अजित पवार आणि त्यांच्यासह गेलेल्या आमदारांना नोटीसही पाठवली आहे.

दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी ही ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी तसेच शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी झालेली नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सुनावणीत कोर्ट मोठा निर्णय देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT