Sonia Doohan Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Sonia Doohan Joined Congress: राष्ट्रीय पातळीवर शरद पवार, अजित दादांना धक्का! राष्ट्रवादीच्या 'लेडी जेम्स बाँड'चा काँग्रेस प्रवेश

Sonia Doohan Latest News: राष्ट्रवादीच्या लेडी जेम्स बाँण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दूहान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपासून त्या अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या

Gangappa Pujari

दिल्ली, ता. ६ ऑगस्ट २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार गटाला राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या लेडी जेम्स बाँण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपासून त्या अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता दूहन यांनी सर्वांनाच धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माजी अध्यक्ष सोनिया दुहान यांनी शरद पवार, अजित पवारांना धक्का देत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हरियाणा काँग्रेसचे नेते भुपेंदर सिंह हुडा, प्रदेशाध्यक्ष उदयभान, काँग्रेस प्रभारी दीपक बावरिया यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

काही महिन्यांपूर्वीच दूहन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप करत शरद पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेतली होती.

मात्र अचानक त्यांनी शरद पवार, अजित पवारांना धक्का देत काँग्रेसला साथ दिली आहे. लवकरच हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्या दृष्टीने हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. स्त्री म्हणजे दुर्गा आहे, स्त्री काली आहे, स्त्री म्हणजे लक्ष्मी आणि तीच स्त्री इंदिरा आहे, असे ट्वीट सोनिया दूहन यांनी केले आहे.

दरम्यान, सोनिया दुहान या शरद पवार यांच्या विश्वासू नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. २०१९ मध्ये त्यांनी अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधी अयशस्वी होण्यात मोलाची भूमिका बजावली होती. सोनिया दुहान यांनी भाजप कार्यकर्त्यांना चकवा देत राष्ट्रवादीच्या चार आमदारांची सुटका केली होती, जे अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी होणार होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT