Maharashtra Politics Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Assembly Election 2024: बच्चू कडू 'बॅट' घेऊन उतरणार विधानसभेच्या मैदानात! प्रहार संघटना आणि वंचित आघाडीला मिळाली निवडणूक चिन्हं; वाचा सविस्तर...

Maharashtra Politics Breaking News: राज्याच्या राजकारणाला सध्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्याने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

Gangappa Pujari

राज्याच्या राजकारणाला सध्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्याने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील दोन महत्वाच्या पक्षांसाठी निवडणूक चिन्ह दिले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला निवडणूक आयोगाने नवे चिन्ह दिले आहे.

वंचित आघाडीला मिळाले गॅस सिलेंडर चिन्ह

आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुद्धा मागे नाही. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव यात्रा करत आहेत. अशातच दिनांक 14 ऑगस्ट रोजी भारतीय निवडणुक आयोग सचिवालयाकडून एक पत्र जारी करण्यात आले. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 'गॅस सिलेंडर' चिन्ह दिल्याचे घोषित केले आहे.

25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दौरा केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी केल्याचे दिसले. यातच राज्यातील संपूर्ण विधानसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीसाठी ही खूप चांगली संधी मानली जात आहे.

बच्चू कडूंच्या प्रहारची निशाणी काय?

त्याचबरोबर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे "बॅट" हे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळाले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवडणूक चिन्हासाठी अर्ज केला होता. यानंतर आता येणाऱ्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बॅट चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT