Rohit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! रोहित पवारांना महाविकास आघाडीतूनच विरोध? उमेदवारी न मिळण्यासाठी काँग्रेस- ठाकरे गटाच्या बैठका; राजकारण तापणार!

Maharashtra Assembly Election 2024: कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, मुंबई|ता. ६ ऑगस्ट २०२४

लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरुन महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. अशातच कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत जामखेड मतदार संघामध्ये सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी तसेच मविआकडून पुन्हा रोहित पवार यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र रोहित पवार यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध केला जात असल्याचे समोर आले आहे.

मागील चार वर्षात रोहित पवार यांनी महाविकास आघाडीचा धर्म मतदार संघात पाळला नाही असा आरोप स्थानिक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळू नये म्हणून काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्याचे सांंगण्यात येत आहे.

दरम्यान, कर्जत- जामखेड मतदारसंघात 2014 साली काँग्रेसच्या तिकिटावर किरण पाटील हे उमेदवार होते. त्यामुळे पुन्हा हा मतदारसंघ आम्हाला मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष आणि त्याचसोबत ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात रोहित पवार यांच्या उमेदवारीवरुन आघाडीत वादाची ठिणगी पडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची न्यायाधीशांकडे मागणी

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने दिला निकाल, नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

SCROLL FOR NEXT