Today's Marathi News Live  Saam tv
महाराष्ट्र

Today Marathi News: उद्या पुण्यातील आंदोलनकर्त्यांशी मुख्यमंत्री करणार चर्चा

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (21 june 2024) : दिवसभरातील ताज्या राजकीय घडामोडी, पावसाचे अपडेट, पंकजा मुंडे, योगा दिवस फक्त एका क्लिकवर. वाचा आजच्या मराठी बातम्या

Vishal Gangurde

CM Shinde: उद्या पुण्यातील आंदोलनकर्त्यांशी मुख्यमंत्री करणार चर्चा

उद्या पुण्यातील आंदोलनकर्त्यांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. मंगेश ससाने यांना फोन करुन विचारपूस करणार आहेत. मुख्यमंत्री उद्या ससाणे यांना फोन करणार आहेत. सगळ्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचे शिष्टमंडळ पुणे आणि जालना येथील वडीगोद्रीला जाणार

मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मंत्र्यांचे शिष्टमंडळ उद्या दि.२२ जून २०२४ रोजीसकाळी ११ वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील येथे ओबीसी आंदोलक अॅड.मंगेश ससाणे यांची भेट घेणार आहे. तसेच दुपारी २ वाजता वडीगोद्री जालना येथे ओबीसी आंदोलक प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहेत.

Murlidhar Mohol: मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील राज ठाकरे यांच्या घरी त्यांनी त्यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थनार्थ सभा घेतली होती.

Pune Porsche Car Accident: विशाल अगरवाल यांना कोर्टाने दिला जामीन

विशाल अगरवाल यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. पुणे सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलाय.विशाल यांना एका गुन्ह्यातून जामीन मिळालाय. इतर गुन्ह्यामध्ये मात्र विशाल अगरवाल यांची सुटका नाहीये.

OBC Meeting : ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करा; शिष्टमंडळाची मागणी

गेल्या तासभरापासून हाके यांच्या शिष्टमंडळासोबत ओबीसी नेते, राज्य सरकारमध्ये बैठक झाली. यात ओबीसी नेते आणि शिष्टमंडळाने ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याची मागणी केलीय.

MLC Election: नाशिक शिक्षक मतदारसंघात शेकडो बोगस शिक्षक मतदारांची नोंदणी; अपक्ष उमेदवार कोल्हे यांचा गंभीर आरोप

नाशिक शिक्षक मतदारसंघात शेकडो बोगस शिक्षक मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केलाय. सर्व बोगस शिक्षक मतदार नोंदणी झालेले मतदार विद्यमान आमदारांच्या शिक्षण संस्थेतील असल्याचाही दावा विवेक कोल्हे यांनी केलाय.

OBC Meeting :  हाकेंच्या शिष्टमंडळासह राज्य सरकारची बैठक सुरू, छगन भुजबळ आक्रमक

लक्ष्मण हाकेंच्या शिष्टमंडळासह राज्य सरकारची बैठक सुरू आहे. या बैठकीत ओबीसीच्या मागण्यासाठी मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत.

Monsoon Rain :  मान्सून नागपूरसह पूर्व विदर्भात दाखल

हवामान खात्याकडून नागपूरसह मान्सून पूर्व विदर्भात दाखल झाल्याची माहिती.

मान्सून नागपुरात 21 जूनला पूर्व विदर्भात दाखल झालाय.

मागील काही दिवसात मान्सून अभावी वातावरणात उकाडा जाणवत असून शेतातील पेरण्याही खोळंबल्या आहेत.

वादळी वाऱ्यासह विदर्भातील जिल्ह्यात पुढील काही दिवस येलो अलर्टसह पावसाचा प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज आहे.

Nagpur Rain: नागपूर शहरातील काही भागात विजांचा कडकडाटसह पाऊस

नागपूर शहरातील अनेक भागात पाऊस सुरू झालाय. शहरातील काहीभागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होतोय. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते, सायंकाळी विजांचा कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

Nana Patole:  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात घेणार महत्त्वाची बैठक, लोकसभा निवडणुकीचा घेणार आढावा

उद्या दुपारी २ वाजता नाना पटोले काँग्रेस भवन येथे बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. काँग्रेस बैठकीला इतर नेत्यांची सुद्धा उपस्थिती लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस बैठकीला इतर नेत्यांची सुद्धा उपस्थिती लागण्याची शक्यता आहे.

Mumbai-Pune Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस तीन दिवस रद्द

पुणे मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलीय. पुणे मुंबई पुणे दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस सलग तीन दिवस रद्द करण्यात आलीय. २८,२९,३० जून रोजी पुणे ते मुंबई जाणाऱ्या या २ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवार २८ जून रोजी पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. शनिवारी २९ जून रोजी मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस रद्द राहणार तर त्याच दिवशी पुणे मुंबई इंटरसिटी सुद्धा धावणार नाही. रविवार ३० जून रोजी मुंबई पुणे इंटरसिटी रद्द असणार आहे. पुणतांबा कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणामुळे रेल्वे विभागाने हा निर्णय घेतलाय.

Arvind Kejrilal : अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार; ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगातच राहणार आहेत. दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी त्यांना नियमित जामीन मंजूर केला होता.

 OBC Agitation: लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला बीडमधून पाठिंबा; बीडच्या माजलगावमधून जाणार 500 वाहनांचा ताफा

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना पाठिंबा देण्यासाठी आता बीड जिल्ह्यात बैठका आणि आंदोलनाचा धडाका सुरुय. बीडच्या माजलगावमधून हाकेंना पाठिंबा देण्यासाठी उद्या तब्बल 500 वाहनांचा ताफा जाणार आहे. काही वेळापूर्वी माजलगावमध्ये ओबीसी समाजाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. उद्या सकाळी १० वाजता हा ताफा निघणार आहे.

Koregaon-Bhima Clash: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण; आरोपी महेश राऊतला अंतरिम जामीन मंजूर

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी महेश राऊतला सुप्रीम कोर्टाचा अंतरिम जामीन मंजूर केलाय. 26 जून ते 10 जुलै या कालावधीसाठी महेश राऊतला जामीन मंजूर झालाय. आजीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी विनंतीवरून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय. राऊत हा जून 2018 पासून अटकेत आहे.

Congerss Protest : नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणी काँग्रेसचं मुंबईत विविध ठिकाणी आंदोलन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईत विविध ठिकाणी नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणी आंदोलन करण्यात आलं.जोगेश्वरी येथे काँग्रेस नेते नसीम खान, खासदार चंद्रकांत हांडोरे,भाई जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आल नीट परीक्षा रद्द करण्यात, यावी अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.

Atal Setu: अटल सेतूला पडल्या भेगा; नाना पटोलेंचा लाईव्ह व्हिडिओ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लाईव्ह व्हिडिओ करुन त्यांनी अटल सेतूवरील भेगा दाखवल्या आहेत. आम्ही फक्त आरोप करत नाही. आज मी लाईव्ह दाखवत आहे. मोठ मोठ्या भेगा पडल्या आणि एक फुटाचा गॅप आहे. भ्रष्टाचार हा त्या मागचा उद्देश आहे. लोकांच्या जिवाशी खेळण्याचा यांना कोणी अधिकार दिला, असं नाना पटोले म्हणालेत.

Raigad News: रायगडमध्ये वट सावित्रीची पुजा करायला गेलेल्या महिलांवर मधमाश्यांचा हल्ला

रायगडमध्ये वट सावित्रीची पुजा करायला गेलेल्या महिलांवर मधमाश्यांचा हल्ला केल्याची घटना घडलीय. पोलादपुर तालुक्यातील निवे गावात ही घटना घडलीय. 14 महिला मधमाश्या चालवल्यामुळे जखमी झाल्या आहेत. या महिलांवर पोलादपुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Congress Protest : काँग्रेस कमिटीच्या वतीने चिखल फेक आंदोलन

केंद्र सरकारच्याविरोधात आज काँग्रेसच्या वतीने राज्यभर चिखल फेक आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या दारात शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चिखल फेक आंदोलन करण्यात आलं. राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था.पेपर फुटी बेरोजगारी. बी बियाणांचा काळाबाजार यांच्यासह अनेक प्रश्नांच्या कडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं.

NEET Exam : नीट परीक्षेचा गोंधळ, पुणे विद्यापीठात ABVPकडून आंदोलन

देशात NET परीक्षेत गोंधळ झाल्याने ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय NTA आणि UGCने घेतला आहे. NEET परीक्षेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारानंतर पुन्हा एकदा NET परीक्षेच्या रूपाने NTA आणि शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. त्याविरोधात आरएसएस प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुणे विद्यापीठात आंदोलन करण्यात आलं.

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू झाली आहे.

महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. आयोगाने निवडणूक याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.

घरोघरी जाऊन मतदार याद्या अदययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या माध्यमातून मतदान केंद्राच्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत. त्यामुळे राज्यात विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

Girish Mahajan : भाजपकडून नाशिकच्या प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नाशिकच्या प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra News : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी ३ नावांची जोरदार चर्चा

महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी महाराष्ट्रातील तीन नावावर चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातून नसीम खान,माणिकराव ठाकरे, मुझ्झफर हुसेन यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. काँग्रेस हाय कमांड लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Arvind Kejriwal News : अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा, कोर्टाकडून अंतिम जामीन मंजूर

अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा दिलासा मिळाला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने जामिनास स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

अरविंद केजरीवाल यांना 2 आठवड्याचा अंतिम जामीन मंजूर केला आहे.

Pune News : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोठी गॅस गळती, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोठी गॅस गळती झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिवम हॉटेलसमोर गॅस गळती झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रस्त्याचं काम सुरु असताना खोदकामादरम्यान ही गॅस गळती झाली.

मोठ्या प्रमाणात आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

 Nanded News : नांदेडमधील पोलीस भरती रद्द, पावसामुळे निर्णय

नांदेडमध्ये 134 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरू झाली होती. गुरुवराी रात्री झालेल्या पावसामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल, अशी माहिती नांदेड पोलीस विभागाने कळवलं आहे. तसे पत्रही पोलीस विभागाने काढले.

बीड जिल्ह्यात ओबीसी आंदोलक महिला आक्रमक, रस्त्यावर टायर जाळले

बीड जिल्ह्यातील ओबीसी आंदोलक महिला आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरत टायर जाळले. अहमदनगर-कल्याण महामार्गावर ओबीसी आंदोलक महिलांनी टायर जाळून रस्ता अडवला. सरकारने आमच्या भावनांचा विचार केला नाही, तर दुर्गेचे आवतार धारण करू, असा इशाराही त्यांनी दिला.

Eknath Khadse : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसेंनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. एकनाथ खडसे लवकरच भाजपमधे प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.

Amravati News : अमरावती ग्रामीण पोलिसांची भरती स्थगित

अमरावती ग्रामीण पोलिसांची भरती स्थगित करण्यात आली आहे. यामुळे उमेदवार घरी परतू लागले आहेत. पावसामुळे मैदानात चिखल साचला होता. या उमेदवारांना पुढील तारीख लवकरच कळवली जाणार आहे. तर अमरावती शहर पोलिसांची भरती प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. तर पावसामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पोलीस आजची भरती पुढे ढकलली आहे.

Girish Mahajan : ओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देणार - गिरीश महाजन

ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव यांच्यासोबत बैठक करून निर्णय घेऊ. लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे. यावर लवकर मार्ग काढावा लागेल, असे गिरीश महाजन म्हणाले.

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसळली

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. भिंत कोसळल्यामुळे मुख्य रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. रात्रीपासून संरक्षक भिंत कोसळून मलबा गटारात वाहून गेला. संरक्षक भिंत कोसळत असल्याचा धोका कायम आहे. ही संरक्षक भिंत दीड किलोमीटर लांबीची आहे

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा योगा केल्यानंतर उपस्थितांसोबत सेल्फी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये योगा डे साजरा केला. श्रीनगरमध्ये योगा डे साजरा केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांसोबत सेल्फी घेतला.

OBC Reservation : लेखी आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेऊ - लक्ष्मण हाके

राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहेत. राज्य सरकारचं शिष्टमंडळ थोड्यावेळात लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहेत. या राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लेखी आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेऊ असे लक्ष्मण हाके यांनी जाहीर केले आहे.

Delhi Water Crisis : मंत्री अतिशी पाणीप्रश्नावरून आजपासून उपोषणाला बसणार

दिल्ली सरकारमधील मंत्री अतिशी या आजपासून उपोषणाला बसणार आहे. दिल्ली पाणीप्रश्नी अतिशी आमरण उपोषण करणार आहेत. 2 दिवसांपूर्वी अतिशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीचा पाणीप्रश्न सोडवला नाही, तर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

Reservation Protest : जालन्यात ओबीसी आणि मराठा आंदोलक एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता

ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे मागील ९ दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्याच ठिकाणाच्या जवळून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीकडे जाणार आहेत. यामुळे ओबीसी आणि मराठा आंदोलन एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच या ठिकाणी राज्य सरकारचं शिष्टमंडळही पोहोचणार आहे.

Navi Mumbai Rain : नवी मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात

नवी मुंबईत सकाळपासून उसंत घेतलेल्या पावसाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईत सर्वत्र रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पामबीच मार्ग सानपाडा येथे पावसाचा जोर वाढला आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बीडच्या दिशेने रवाना

मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी नगरहून बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर थेट बीडमधील चाकरवाडी या गावाला जाऊन एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. छत्रपती संभाजीनगराहून पाचोड वडीगोद्री शहागडमार्गे सोलापूर धुळे हायवे रस्त्याने बीडला जाणार आहेत.

Maharashtra Politics : महाराष्ट्र भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक

महाराष्ट्र भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीने बैठक आयोजित केली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांच्या संदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडेंसह कोअर कमिटीतील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT