Maharashtra's Live Batmya in Marathi (2 April 2024) Also Check for the Latest Update on Lok Sabha Election, PM Modi, VBA, Pune and much more Saam TV
महाराष्ट्र

Today's Marathi News Live: वंचित आघाडीची उमेदवारी जाहीर, पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी

Maharashtra Latest News and Update in Marathi (2 April 2024): राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.

प्रविण वाकचौरे

वंचित आघाडीची उमेदवारी जाहीर, पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. या यादीत ५ उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. या यादीतील तिसऱ्या नावाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे तिसरे नाव आहे वसंत मोरे यांचे. वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आलीय. वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

बालाघाट जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; २ नक्षली ठार

गोंदिया जिल्हाशेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, मंडला आणि शेजारील जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिमेत सहभागी जवानांना मोठे यश मिळाले आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या नक्षलग्रस्त भागात बालाघाट पोलिसांनी २ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.

सांगलीच्या जागेचा तिढा वाढला, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आक्रमक

काँग्रेसच्या राज्य प्रचार निवड आणि बैठकीवर बहिष्कार टाकणार असा इशारा आमदार विश्वजित कदम यांनी दिलाय. सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने विश्वजीत कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवले. तिढा सुटत नसल्याने कदम यांनी राज्य प्रचार निवड आणि बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. विश्वजीत कदम यांची काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या सदस्य पदी ३० मार्च रोजी निवड करण्यात आली आहे.

पंढरपुरात शहरातील एका घरात स्फोट; महिला गंभीर जखमी

पंढरपुरात शहरातील एका घरात स्फोट झाल्याची घटना घडलीय. यात एक महिला गंभीर जखमी झालीय. मयुरी मेनकुदळे असं जखमी महिलेच नाव आहे. फटक्यांचा किंवा मिक्सरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

गुगल फॉर्मव्दारे संकल्पपत्रासाठी भाजपा घेणार मुंबईकरांच्या सूचना

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईकरांच्या अपेक्षा, सूचनासह भाजपाचे संकल्पपत्र तयार करण्यात येणार असून आजपासून भाजपातर्फे गुगल फॉर्ममध्ये या सूचना घेण्यात येणार असून आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

मनसेकडून गुढी पाडवा मेळाव्याचा टीझर रिलीज

९ एप्रिल रोजी मनसेचा मेळावा होणार आहे. गुढी पाडव्याच्या मेळाव्याचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आलाय. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्याच्या राजकीय विषयावर भाष्य करणार आहेत.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा लोकसभेच्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नामनिर्देशन दाखल केले आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शर्वरी तुपकर आणि शेतकरी, शेतमजूर उपस्थित आहेत.

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार निवडणूक लढवेल: नारायण राणे

आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाविषयी भाष्य केलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपचाच उमेदवार लढवेल. उमेदवार पक्ष ठरवेल, कुणी लुडबुड करू नये. मला उमेदवारी मिळाली तर मी लढवेल आणि जिंकेल सुद्धा. मला राजकारणात ५६ वर्षे झाली आहेत, मला कुणी काहीही सांगितलेलं नाही. माझ्या पक्षाची ताकद मला माहीत असल्याचं नारायण राणे यावेळी म्हणालेत.

Maharashtra Election 2024: स्वतःला सम्राट समजणाऱ्यांचा सातबारा कोरा करणार -अनंत गीते यांची सुनील तटकरेंवर टीका

रायगड लोकसभा मतदार संघांमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात जन संवाद दौऱ्याच्या माध्यमातून केली. गीते यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे याना लक्ष्य केले आहे. रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे स्व:तला अनभिषिक्त सम्राट समजतात पण त्यांचा सातबारा या लोकसभा निवडणुकीत कोरा करून टाकणार अशी टीका गीते यांनी तटकरेंचे नाव न घेता केली.

छत्रपती संभाजी नगर : ५ एप्रिलनंतर आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया करता येणार

शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर. टी.ई प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल केले आहेत. या बदलांमुळे आरटीईच्या प्रवेशासाठी जागा वाढल्या असून राज्यभरात ७५ हजार ८५६ शाळांमधील ९ लाख ७१ हजार २०२३ जागा आता प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत .येत्या आठवड्यात ५ एप्रिलनंतर ही विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३५७० पैकी २८१६ शाळांनी नोंदणी केलेली असून जिल्ह्यातील क्षमता ४० हजार ४५७ आहे.

PM Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेकमधून प्रचाराचं बिगुल फुंकणार

अमित शाह ६ एप्रिलला विदर्भातून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. तर १० एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा रामटेकला तर दिक्षाभूमीला अभिवादन करून १४ एप्रिलला चंद्रपुरात सभा घेणार घेणार आहेत.

VBA News: वंचित बहुजन आघाडीनंतर MIM देखील सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?

वंचित बहुजन आघाडीनंतर आता सोलापुरात एमआयएमदेखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची सोलापूर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी संदर्भात कदम यांच्याशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सोलापूर लोकसभा हे अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असल्याने रमेश कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

रमेश कदम हॆ २०१४ साली मोहोळ विधानसभेतून आमदार म्हणून निवडणून आले होते.मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळा प्रकरणात गेली अनेक वर्ष तुरुंगात होते. मात्र काही महिन्यापूर्वी ते जामीनावर बाहेर आले असून आगामी लोकसभेच्या दृष्टीने तयारी करत असल्याची माहिती मिळालीय.

धाराशिवमधील उमेदवारीचा तिढा कायम; जागा राष्ट्रवादीला मात्र उमेदवार ठरेना

भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील ह्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते.मात्र काही कारणास्तव त्यांचा पक्षप्रवेश रखडलाय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुंबई बाहेर असल्याचे कारण सांगत पक्ष प्रवेश पुढे ढलण्यात आलाय. अर्चना पाटील यांचे समर्थक मुंबई येथे ठाण मांडून आहेत. त्या आज पक्षप्रवेश करणार होत्या. त्यांच्या या पक्षप्रवेशाला शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याने विरोध केला होता.

Maharashatra Election 2024: संजय देशमुख यांनी दाखल केला नामांकन अर्ज

वाशीम लोकसभेसाठी संजय देशमुख यांनी नामांकन अर्ज दाखल केलाय. हजारोंच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे संजय देशमुख उमेदवार आहेत.

महाविकास आघाडीकडून खासदार संजय जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

परभणी लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर शनिवार बाजार ते शिवाजी पुतळा ठिकाणी रॅली काढण्यात येत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे राजेश टोपे परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांची यांची रल्लित उपस्थिती होती.रॅलीचा समारोप शिवाजी पुतळा परिसरात सभा घेण्यात आली.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये निरीक्षकांची नियुक्ती

लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमले निरीक्षक

महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये निरीक्षकांची नियुक्ती

प्रशासकीय व्यवस्था, सुरक्षा आणि उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी

७ कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांना नेमले विशेष निरीक्षक

माजी IPS अधिकारी धर्मेंद्र गंगवर आणि एन के मिश्रा यांची नियुक्ती

लातूरच्या उदगीर तालुक्यातील अवलकोंडा तलावात पुढील आठ दिवस पुरेल इतकाच जिवंत पाणीसाठा शिल्लक

लातूरच्या उदगीर तालुक्यातील अवलकोंडा तलावात पुढील आठ दिवस पुरेल इतकाच जिवंत पाणीसाठा शिल्लक

तलावातील पाणी मोटरने उपसा केल्याने तलाव कोरडा होत चाललाय

येत्या काळात नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचे शक्यता

जिल्हाधिकारी यांनी पाणी आरक्षित ठेवण्याचे आदेश देऊनही स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्षामुळे तलाव कोरडा 

उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात पक्षप्रवेश होण्याची शक्यता

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात पक्ष प्रवेश होण्याची शक्यता

मातोश्रीवर सध्या उद्धव ठाकरे, संजय राऊत, उन्मेष पाटील, करण पवार आणि संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यात बैठक सुरू

जळगावमधून उन्मेष पाटील किंवा करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळण्याची शक्यता

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल

उमेदवारी दाखल करताना शिवसेनेचे गुलाबराव पाटील , आमदार श्वेता महाले , राजेंद्र शिंगणे , आमदार संजय गायकवाड , आमदार संजय रायमुलकर उपस्थित

भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांची अनुपस्थिती

बुलढाणा लोकसभा मतदार संघातून प्रतापराव जाधव यांची उमेदवारी दाखल

सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना आणखी एक संधी दिली

सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना आणखी एक संधी दिली

कोर्टाने अधिक चांगले प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे

बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांनाही पुढील सुनावणीला कोर्टात हजर राहावे लागणार

10 एप्रिल रोजी होणार पुढील सुनावणी

विजय शिवतारे ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल

विजय शिवतारे ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल

बारामतीतून निवडणूक लढणाचा विचार माघार घेतल्यानंतर पहिल्यांदाच विजय शिवतारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

सोशल मीडियावर टीका करताना विरोधकांवर कमरेखालची टिप्पणी करू नका

सोशल मीडियावर टीका करताना विरोधकांवर कमरेखालची टिप्पणी करू नका

भाजप सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांना सूचना

भाजप महाराष्ट्र प्रभारी व खासदार दिनेश शर्मा यांच्या सूचना

महायुती विरोधात कुणीही नकारात्मक बोलू नका

मुंबई पदाधिकाऱ्यांना शर्मा यांचे आदेश

१२ एप्रिल पर्यंत प्रत्येक विधानसभेत महायुतीचे संयुक्त मेळावे घ्या

मुंबईतील ३६ विधानसभेत महायुतीचे मेळावे घेण्याचे आदेश

अमरावती लोकसभेसाठी आनंदराज आंबेडकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

अमरावती लोकसभेसाठी आनंदराज आंबेडकर आज 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार

वंचित बहुजन आघाडी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती

अमरावतीत प्रकाश आंबेडकर मोठी खेळी करण्याची शक्यता

प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर व मुलगा सुजात आंबेडकर अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार

अमरावती लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार प्राजक्ता पिल्लेवाण यांना वंचितने केलि होती उमेदवारी घोषित

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार

नवी मुंबईतील नेरुळमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने केला लैंगिक अत्याचार

याप्रकरणी नेरुळ पोलिसांकडून 23 वर्षीय तरुणावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक

फूस लावून जबरदस्तीने सदर आरोपीने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी अधिक तपास नेरुळ पोलीस करत आहेत.

ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात, अपघातात चार जण ठार तर १० ते १२ जण जखमी

ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा सांगली-सोलापूर हायवेवर अपघात

अपघातात चार जण ठार तर १० ते १२ जण जखमी

ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टरला ट्रकची मागून जोरात धडक

मृतांमध्ये दोन महिला एक मुलगा आणि एक लहान मुलीचा समावेश

पुण्यात गुरुवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा राहणार बंद

पुण्यात गुरुवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा राहणार बंद

उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठा बंद होत असल्याने पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागेल

वराजे जलकेंद्र अंतर्गत सगळा भाग, लष्कर जलकेंद्र भाग, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, कोंढवे धावडे जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र परिसर, वडगाव, कात्रज कोंढवा परिसर या भागात पाणी पुरवठा राहणार बंद

नाशिकच्या जागेवरून महायुतीमधील तिढा कायम

नाशिकच्या जागेवरून महायुतीमधील तिढा कायम

खासदार हेमंत गोडसे आज ११ वाजता घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

हेमंत गोडसे यांच्यासह दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी आणि नाशिकचे पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

नाशिकच्या जागेबाबतचा १० पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार

नाशिकची जागा भुजबळांना दिल्यास शिंदेंच्या शिवसेनेत मोठं बंड होऊ शकतं

पक्ष संघटन बांधणीवर विपरीत परिणाम होईल

नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात पक्ष संघटनेला मोठा फटका बसेल

भुजबळांना असलेला विरोध पाहता त्यांना निवडून येण्यात अडचणी, महायुतीची १ जागा कमी होईल

अशा अनेक मुद्द्यांचा अहवालात समावेश असल्याची माहिती

भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष

मुंबई-नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटत ट्रकला

Shahapur News

मुंबई-नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटत ट्रकला आग

नाशिकहून मुंबई दिशेने जात असलेल्या ट्रकला नवीन कसारा घाट उतरत असताना अचानक आग

शाॅर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज

आग विझवण्यासाठी मुंबई-नाशिक एक्स्प्रेसच्या अग्निशमन दलाची मदत

आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या संदर्भात आज केंद्र सरकार आपलं उत्तर सादर करणार

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या संदर्भात आज केंद्र सरकार आपलं उत्तर सादर करणार

९ एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे

इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML), आसाम काँग्रेसचे नेते देबब्रत सैकिया यांच्यासह इतर याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत

या याचिकेत नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024 रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे

CAA अवैध स्थलांतरितांना कायदेशीर ठरवते त्यामुळं स्थानिक संस्कृतीवर त्याचा परिणाम होणार असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे

निवडणुकीच्या काळात देशात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज

ऐन निवडणुकीच्या काळात देशात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज

एप्रिल मे महिन्यात तापमान राहणार अधिक,मध्य आणि पश्चिम भारताला उष्णतेच्या लाटेचा धोका अधिक आहे

महाराष्ट्रातही मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढ होणार

२ ते ३ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता

उष्णतेच्या लाटेपासून कसा बचाव करावा याच्या आरोग्य विभागाने सूचना द्याव्यात अस आवाहन हवामान विभागाने केलं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: पर्थमध्ये पुन्हा टॉस बनणार बॉस? पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय निश्चित? पाहा रेकॉर्ड

Sakal Exit Poll: कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये राजेश लाटकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Indapur Exit Poll : इंदापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना मोठा झटका

Maharashtra Exit Poll: नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT