Aajchya Marathi Batmya Live - 18 may 2024 | Latest Updates on IPL, maharashtra latest news  Saam Tv
महाराष्ट्र

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (18 may 2024): देश-विदेश राज्यातील प्रत्येक घडामोडी, लोकसभा निवडणूक लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर

Vishal Gangurde

पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

तुटलेली वायर झाडावर पडून लागली आग.

ससाणेनर परिसरात असलेल्या हिंगणे मळ्यात सायंकाळच्या सुमारास सोसायट्याचा वाऱ्यात हाय टेन्शन वायर तुटली होती.

यात झाडाला आग लागली असून घटनास्थळावर अग्नीशामक दाखल झाले असुन आग विझवण्यात आली आहे.

तीन बळी घेणारा 'भोला' जेरबंद;  

३ जणांचे बळी घेणाऱ्या ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील 'भोला' या वाघाला जेरबंद करण्यात यश... चिमूर तालुक्यातील निमढेला परिसरात डार्ट मारून जेरबंद करण्यात आलं आहे.

या वाघाला, भोलाच्या हल्ल्यात बुधवारी याच परिसरात एका ३५ वर्षीय शेतकऱ्यांचा गेला होता जीव

तर याआधी त्यांच्या हल्ल्यात २ जणांचा झालाय मृत्यू,

त्यामुळे वनविभागाने या वाघाला केले जेरबंद,

पुण्यातील गुलटेकडी परिसरात वाहनांची तोडफोड

दुपारच्या सुमारास दुचाकी वरुन आलेल्या टोळक्याने आरडाओरडा करत केली दुचाकीं ची तोडफोड

⁠भर दुपारीगुलटेकडीच्या एक दिल तरुण मंडळाच्या समोर पार्किंग केलेल्या रिक्षा दुचाकी आणि इतर वाहनाची टोळक्याने केली तोडफोड.

तोडफोडीमुळे परिसरातील नागरिक भयभीत.

तोडफोडीचे कारण अस्पष्ट.

शेगाव खामगाव परिसरात मुसळधार पाऊस

यंदा मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळतायेत. यामध्ये आज शनिवारी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शेगाव, खामगाव परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

पुणे सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं; वाहनांचं मोठं नुकसान

पुणे सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोल नाका जवळील गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरील होर्डिंग थेट कार्यालयाच्या समोर कोसळल्यामुळे दुचाकी चार चाकी सह बँड वादकांची गाडी याचे मोठे नुकसान झाले.

मिरवणुकीसाठी आणलेला घोडा सुद्धा होर्डिंग अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालाय.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा अवकाळी पाऊस.

सावंतवाडी, कुडाळ तालुक्यात अवकाळी पाऊस.

विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे सर्वांची तारंबळ.

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.

उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबदेवीच्या दर्शनाला

पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराची सांगता होताच उद्धव ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनाला

सर्व आमदार खासदारांना घेऊन भाजप कार्यालयात उद्या १२ वाजता येणार, अरविंद केजरीवाल यांचं भाजपला आव्हान

मी माझ्या सगळ्या मंत्री, खासदार, आमदार आणि मोठ्या नेत्यांसह उद्या दुपारी १२ वाजता भाजप ऑफिसला येणार

तुम्हाला ज्यांना ज्यांना जेलमध्ये टाकायचं त्यांना एकसाथ जेलमध्ये टाका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं भाजपला आव्हान

आम आदमी पक्ष जेलमध्ये टाकल्याने संपणार नाही, आप हा पक्ष नाही विचार आहे

आम्ही दिल्लीत चांगल काम केलं हा आमचा कसूर आहे का ?

केजरीवाल यांचा भाजपला सवाल

उमरगामध्ये मध्यरात्री २० ते २५ गाड्यांची तोडफोड

धाराशिवच्या उमरगा शहरातील आदर्श विद्यालय ते साने गुरुजी नगर भागातील नागरिकांच्या गाड्यांच्या काचा फोडून नासधूस केल्याचा प्रकार समोर आला आहे.मध्यराञी ही घटना घडली असुन यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या भागातील २० ते २५ वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर पोहोचणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दादर शिवाजी पार्क येथे दाखल होणार

शिवेसेनेच्या शिंदे गटाच्या प्रचाराची सांगता होणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन करून होणार समारोप.

अमोल किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रोड शो

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या प्रचाराचा आजचा हा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवशी मुंबईत सर्वच पक्षांकडून रोड शो आणि बाईक रॅली काढण्यात आल्या उत्तर पश्चिम मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी देखील अंधेरी पूर्वेकडील साग बाग ते जोगेश्वरी शिवटेकडी दरम्यान भव्य रोड शो आणि बाईक रॅली काढली.

अरविंद सावंत यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत ठसा उमटवला; किशोरी पेडणेकर

बीकेसीवर जमलेली गर्दी ही पैसे देऊन आणलेली नव्हती तर शिवाजी पार्कवरील सभा ही दर्दी लोकांची होती

अरविंद सावंत यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत ठसा उमटवला आहे

हा कर्ण तुम्हाला धारातीर्थ पाडल्याशिवाय राहणार नाही

ज्यांनी आमच जीवन हराम केलाय त्यांना शांत बसू देणार नाही

महायुतीने सावरकरांच्या नावावर केवळ राजकारण केलं; अरविंद सावंत

आजचा दिवस महत्वाचा आहे. मुंबईकरांनी निष्ठावंत निवडायचा की पक्ष सोडून गेलेल्यांना, याचा निर्णय करावा. महायुतीने सावरकरांच्या नावावर केवळ राजकारण केलं. त्यांनी सावरकरांना भारतरत्न का दिला नाही ? ज्या प्रकारे मुलुंडमध्ये पैसे वाटण्याचा प्रकार घडला तसाच प्रकार दक्षिण मुंबईत देखील घडला. पोलीस आणि गृह खात्याच्या आशिर्वादाने हा सगळा प्रकार सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी केला.

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालं असून यासोबतच तळोदा शहराची ग्रामदैवत असलेल्या कालिकामाता यात्रोउत्सवात यात्रेसाठी आलेले नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे व्यापाऱ्यांचे तंबू हे उडाले.

माजी पंतप्रधान, माजी उपराष्ट्रपती ंबजावला मतदानाचा अधिकार 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी घरून मतदानाचा हक्क बजावला

गोदान एक्स्प्रेसच्या एका डब्याला लागली आग

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळ गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर निघाला. अप मार्गाच्या गोदान एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने धूर निघाला. गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत थांबवली गाडी. धूर बघून प्रवाशांची उडाली तारांबळ, प्रवाशांनी रेल्वेतून मारल्या उड्या गार्ड आणि ड्रायव्हर दोघांनी उतरून एक्स्प्रेस तपासली. त्यानंतर रेल्वे इगतपुरी स्थानकात आल्यानंतर गाडीची बोगी लायनर दुरुस्त करून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली .

भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

विठ्ठल भक्तांची पदस्पर्श दर्शनाची प्रतीक्षा संपली. दोन जून पासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे.

Mumbai News : भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

घाटकोपर दुर्घटनेत दोषी असलेल्या इगो मीडिया या जाहिरात कंपनीचे दादरच्या टिळक पूल परिसरात आठ अनधिकृत होर्डिंग आहेत. या आठ होर्डिंगपैकी एका होर्डिंगची लांबी 80 आणि रुंदी 100 फूट आहे. हे आठही होर्डिंग तीन दिवसात काढून टाकावेत, अशी नोटीस महापालिकेने पश्चिम रेल्वेला नोटीस दिली आहे.

Pune News : पुण्यात सोन्याच्या दुकानावर दरोडा, परिसरात खळबळ

पुण्यात वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत सोन्याच्या दुकांनावर दरोडा पडला आहे. पुण्यात वानवडी पोलीस ठाणे हद्दीत ७ अनोळखी आरोपींनी मास्क दरोडा टाकला आहे. मोहम्मद वाडी रोड वारकर भागातील दुकानावर दरोडा टाकून ३०० ते ४०० ग्राम सोने लंपास केले आहे.

Pune News : पुण्यात तिसऱ्या दिवशी हत्येची घटना, डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाची घटना घडली आहे.

पुण्यातील कोंढवा भागात डोक्यात दगड घालून तरुणाचा खून करण्यात आला आहे.

आज पहाटे ही घटना उघडकीस आली. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Ghatkopar Hording Accident : अवैध होर्डिंगवर कारवाईचे आदेश; सरकारकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सरकारचे निर्देश दिले आहेत.

शासकीय जागांवरचे अवैध होर्डिंगवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

घाटकोपर दुर्घटनेनंतर कारवाईचे आदेश दिले आहेत.

Pune Fire News : पुण्यातील लार्गो पिझ्झा हॉटेल आग

पुण्यात खराडी येथे लार्गो पिझ्झा हॉटेलमध्ये आग लागली आहे. आज शनिवारी पहाटे ५ वाजता हॉटेलला आग लागली. या आगीवरअग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.

Mumbai News : मुलुंड राडा प्रकरण : ५ शिवसैनिकांना अटक

मुलुंड राड्या प्रकरणी पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.

सरकारी कामात अडथळा आणणे आणि दंगल माजवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी पैसे वाटपाच्या आरोपावरून शिवसैनिकांनी ईशान्य मुंबईतील भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.

Nashik News : नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना नोटीस

- उद्धव ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

- नाशिक पोलिसांकडून नोटीस देण्यात आली.

- तीन दिवसासाठी हद्दपारीची नोटीस देण्यात आली

Pune News : पुण्यात धंगेकरांनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

आमदार रवींद्र धंगेकर यांच्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप यांच्यासह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आचारसंहिता असतानाही बेकायदेशीर जमाव जमून घोषणाबाजी करुन उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

Wardha News : वर्धा जिल्ह्यात ७६ जनावरांना विषबाधा

वर्धा जिल्ह्यातील रसुलाबाद येथे ७६ जनावरांना विषबाधा झाली. ज्वारीचे कोंब चारा खाल्ल्याने चाऱ्यातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वेळीच उपचार मिळाल्याने जनावरांचे प्राण वाचले.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाचं CCTV समोर आलं आहे. स्वाती मालीवाल घरातून बाहेर निघताना व्हिडिओत दिसत आहेत. १३ मे रोजीचा हा व्हिडिओ आहे. दिल्ली पोलिस महिला कर्मचारी स्वाती मालीवाल यांना हाताला धरून बाहेर येत असताना व्हिडिओमधून दिसत आहे. स्वाती मालीवाल यांनी दावा केला होता की, मुख्यमंत्री निवासस्थानी महिला पोलिस कर्मचारी नव्हत्या'.

Uddhav thackeray : ४ जूननंतर अच्छे दिनाची सुरुवात होईल -  ठाकरे

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

चार जूनला जुमला पर्व संपत आहे.

येत्या ४ जुनपासून अच्छे दिनाची सूरवात होईल.

कारण इंडिया आघाडीचं सरकार देशात येत आहे.

Mumbai News : महायुतीच्या सभेविषयी अफवा उडवणाऱ्याला अटक

शिवाजी पार्कवरील महायुतीच्या जाहीर सभेत गोंधळ होणार असल्याची अफवा उडवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सभेपूर्वी मुंबई पोलिसांच्या १०० नंबरवर कॉल करून गडबड होणार असल्याची खोटी माहिती दिली होती. कॉल करत माहिती देत पोलिसांना बंदोबस्त वाढवण्यास सांगितले होते. यानंतर पोलिसांनी कनप्पा रेड्डी नावाच्या 52 वर्षे इसमाला अटक केली आहे.

Maharashtra Politics : महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद घेणार

महाविकास आघाडीची काही वेळातच संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आले आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

Mumbai News : आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला

भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे आज ईशान्य मुंबईचा दौरा करणार आहे. ईशान्य मुंबईत भाजपकडून मिहीर कोटेचा तर ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील रिंगणात आहेत.

Lok Sabha Election : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता; सभांचा धुराळा उडणार

- लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता आहे.

- नाशिक जिल्ह्यात प्रचार सभांचा धुराळा उडणार आहे.

- धुळे लोकसभा महायुतीचे उमेदवार प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मालेगावात सभा आहे.

Pune News : पुण्यात सुट्टीच्या दिवशी पीएमचीची पर्यटन सफर

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने पुणे दर्शन बससेवा

धार्मिक व पर्यटन स्थळी विशेष सेवा सुरु

प्रत्येक आठवड्याच्या शनिवार रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही सेवा

प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT