Omicron
Omicron  saam media
महाराष्ट्र

Breaking : पुण्यातील नारायणगाव आणि वारुळवाडी ठरतंय Omicron चा हाॅटस्पाॅट!

रोहिदास गाडगे

पुणे : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junnar) तालुक्यातील वारूळवाडी व नारायणगाव येथील एकूण ७ जणांना ओमायक्रॉनची (Omicron) लागण झाल्याचे उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. नारायणगाव वारुळवाडी येथील 16 रहिवासी दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून ते परत आल्यानंतर 12 डिसेंबरला 16 जणांचे RTPCR नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते.

17 डिसेंबर रोजी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेच्या (NIV) अहवालानुसार हे सर्व जण ओमायक्रॉन बाधित असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या सर्व रुग्णांचे लसीकरण (Vaccination) झाल्याची माहिती समोर आली होती. यातील 5 जणांचे कोविशील्ड (covishield) चे दोन्ही डोस पूर्ण असून उर्वरित दोघांनी एक डोस घेतला आहे. सर्व रुग्णांना नारायणगाव (Narayangaon) ग्रामीण रुग्णालयात विलगीकरणात ठेण्यात आले आहे.

याच १६ पर्यटकांच्या संपर्कातील नातेवाईक व इतर नागरिकांची RTPCR तपासणी करण्यात आली. त्यातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार दिवसांपुर्वी ओमायक्रॉनचे सात रुग्ण आढळल्यानंतर आता या दुबई वारीवरून परतलेल्या या ७ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तीन रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे नारायणगाव आणि वारुळवाडी ओमायक्रॉनचा हाॅटस्पाॅट ठरतंय कि काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. आधीचे ७ व नवे ३ अशी ओमायक्रॉन बाधितांची जुन्नर तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १० वर पोहचली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT