Breaking : रक्तपेढीतील रक्तातून चिमुकलीला HIV ची बाधा! SaamTv
महाराष्ट्र

Breaking : रक्तपेढीतील रक्तातून चिमुकलीला HIV ची बाधा!

उपचारादरम्यान एचआयव्ही (HIV) बाधीत रक्तपुरवठा झाल्यामुळे आठ महिन्यांची एक चिमुकली अकोल्यातील मूर्तिजापुरात एचआयव्ही बाधीत झाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जयेश गावंडे

अकोला : उपचारादरम्यान एचआयव्ही (HIV) बाधीत रक्तपुरवठा झाल्यामुळे आठ महिन्यांची एक चिमुकली अकोल्यातील मूर्तिजापुरात एचआयव्ही बाधीत झाली असून महिनाभरापूर्वीच्या या प्रकाराची तक्रार, आज या चिमुकलीच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आरोग्यमंत्र्याकडे दिली आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर येथील अवघाते हॉस्पीटल मध्ये तालुक्यातील हिरपूरच्या एका ८ वर्षीय चिमुकलीवर उपचार सुरू होते. तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यामुळे अकोल्याच्या बी.पी.ठाकरे रक्तपेढीतून मागविण्यात आलेले रक्त तिला देण्यात आले होते.

हे देखील पहा -

त्यानंतरही तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशींमध्ये वाढ होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे तिला अमरावतीच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथील तपासणीत तिचा एचआयव्ही अहवाल पॉझीटीव्ह आला. तिच्या आई-वडीलांचा, मात्र निगेटीव्ह आला. त्यामुळे एचआयव्ही बाधीताचे रक्त देण्यात आल्यामुळे ही चिमुकली बाधीत झाल्याची शंका बळावली. दरम्यान सदर चिमुकलीच्या पालकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आरोग्यमंत्र्याकडे यासंदर्भात तक्रार दिली आहे.

दरम्यान, या संदर्भात अवघाते हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी बालीकेच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याने तिला ते रक्त देणे आवश्यक होते. परंतु आमच्याकडे अधिकृत रक्तपेढीतुन आलेले रक्त संपूर्ण तपासण्या केलेले रक्त असल्याचे आम्ही गृहीत धरतो, नातेवाईकांनी आणलेले रक्त आम्ही चढवीले ते पॉझिटीव्ह असल्याचे आम्हाला माहिती नसल्याचे सांगितले. तर रक्तदात्यांकडून रक्त घेतल्या नंतर त्या रक्ताच्या किमान पाच तपासण्या केल्या जातात, या बाळाला ज्या व्यक्तीचे रक्त देण्यात आले तेव्हा तो निगेटिव्ह होता. 'विंडों पिरियड' दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे रक्तपेढीकडून सांगण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मऊ, खुसखुशीत रूमाली रोटी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

SCROLL FOR NEXT